समाजातील आर्थिक आणि सामाजिक स्तर म्हणजे वर्ग.मानवी समाजात गरीब मध्यम श्रीमंत असे आर्थिक वर्ग आहेत,तसेच एस. सी , एस. टी, ओबीसी, अल्पसंख्य असे सामाजिक स्तर आहेत,तर हिंदुधर्मात ( नव्हे वैदिक ब्राम्हण धर्मात ) ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शूद्र , अती शूद्र,असे पाच वर्ण आहेत.आणि साडेसहहजार जाती आहेत,आणि त्यांच्यात उच्चनीच, श्रेष्ठ कनिष्ठ ,अस्पृश्य स्पृश्य असा भेदभाव आहे.
अशा गुंतागुंतीच्या आर्थिक सामाजिक जातीत,प्रवर्गात ,वर्गात आपण जगत आहोत.यामुळे आपणास अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागते.आपली आर्थिक व्यक्तिगत नुकसान होत असते,दरवर्षी जातीचे,धर्माचे,प्रवर्गाचे भांडणे होतात,त्यातून आग भडकते.हिंसा होते.अनेक निष्पाप जे जातीच्या धर्माच्या भांडणात पडत नाहीत,अशा निष्पाप लोकांचा बळी जातो आणि त्यांच्या कष्टाने मिळवलेल्या मालमत्तेची हानी होते,त्यांना जीवन जगणे कठीण होते.
हे कित्येक वर्षापासून चालत आलेले आहे.जातीय दंगली,धर्मीय दंगली,वर्गीय दंगली,प्रवर्गाच्या दंगली यामुळे सामान्य नागरिक जे दिवसभर काम करतात आणि आपला संसार चालवतात, अशांना त्रासात जीवन जगावे लागते. केव्हढा हा दुष्परिणाम.तरी जातीय धार्मिक दहशतवादी हे दंगे धोपे बंद करीत नाहीत.कारण यामागे राजकीय पुढारी असतात..ते त्यांची सत्ता संपती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ते जात धर्म प्रवर्ग वर्ग या गोष्टींचा सर्रास वापर करतात.
यावर एकच उपाय,तो म्हणजे हे आर्थिक आणि सामाजिक वर्ग आणि प्रवर्ग आणि जाती नष्ट करणे.त्याशिवाय तरणोपाय नाही.
यासाठी विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करावी लागेल.
ती कशी करणार ? तर समतेचे विचार मान्य असणाऱ्यांनी एकत्र येणे,अभ्यास करणे,संघटित होणे आणि संघर्ष करणे.विषमतावाद्यांच्या विरोधात जबरदस्त आंदोलन छेडने,त्यांना सलो की पलो करणे,समतावादी विचारांचे सरकार बनवणे.
असे केले तरच ही जातीची, प्रवर्गाची,धर्माची,प्रवर्गांची भांडणे थांबतील.आपोआप आर्थिक वर्ग पण नाहीसे होतील.साऱ्याच क्षेत्रात समता नांदेल.आणि तुमच्या आमच्यात सर्वातच बंधुभाव निर्माण होईल,सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता,राष्ट्राची अखंडता निर्माण होईल.


