बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने,नगराध्यक्ष पदासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी शनिवारी, (दि. १५) दुपारी उत्साहपूर्ण वातावरणात
उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला.
अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, ज्येष्ठ नेते अशोकराव इजगुडे,गजानन गवळी,गणेश महाजन,पोपट शिंदे,स्वप्निल राऊत,अॅड.किरण लोंढे,बापूराव जामदार,प्रमोद राऊत,सुनील तळेकर,मुकुंद कन्हैयालाल शहा,संजय दोशी,अंगद शहा,प्रशांत उंबरे,अक्षय सूर्यवंशी,केशव बोराटे,शुभम पवार,सौरभ शिंदे,प्रवीण हरणावळ यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो कार्यकत्यांची मोठी उपस्थिती होती.
विकास गतिमान करू…
मी आज अर्ज दाखल केला असला तरी इंदापूरसाठीची माझी धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी प्रकल्प,रस्ते विकास,महिलांसाठी सुरक्षितता, युवकांसाठी रोजगार,आदी क्षेत्रांत बदल घडवण्यासाठी मी ठाम आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरचा विकास वेगाने पुढे नेऊ.असाही शब्द भरत शहा यांनी दिला.
सर्वांना बरोबर घेऊन कामे करणार,शहर विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक,प्रामाणिक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार केला आहे.
इंदापूरच्या जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा हीच माझी ताकद आहे. नव्या इंदापूरच्या निर्मितीसाठी मी मनापासून आणि निष्ठेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया भरत शहा यांनी पत्रकारांना दिली.
इंदापूरचा सर्वांगीण विकास हा माझ्यासाठी केवळ संकल्प नाही,ही माझी जबाबदारी आहे.नगराध्यक्ष पदाची उमेदवारी म्हणजे सन्मानाबरोबरच मोठी जवाबदारी असून,इंदापूरच्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास टिकवण्याचे व शहराचा कायापालट करण्याचे मी वचन देतो,अशी ग्वाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांनी दिली.



