उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातलेल्या आहेत.या निवडणूकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी एकत्र आले असल्याने महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच नगरपरिषद व नगरपंचायतचे निकाल फिरणार असल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व मतदार हे धाडशी वृत्तीचे व न डगमगणारे आहेत.सर्व परिस्थितीला हाताळण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार हे महाराष्ट्र राज्यात मतचोरी करु देणार नाही.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुध्दा सतर्क झाले असून त्यांचे मतचोरांकडे लक्ष आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ,महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडणूक समितीचे महाराष्ट्र पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्यासह सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ता वर्ग आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला माणणारे मतदार हे समयसूचकतेनुसार यावेळी विजयासाठी प्रयत्न करतील असेच राजकीय वातावरण आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार,आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिव ओतणार हे सुद्धा तितकेच खरे आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर,युवा नेतृत्व सुजात आंबेडकर हे कायदेशीर,राजकीय,सामाजिक दृष्टीने परिपक्व असल्याने महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करतील असे दिसून येते आहे.
मात्र,येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसी समन्वय साधून आपुलकीने कर्तव्य पार पाडणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
क्षणाक्षणाला सावध राहात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वादविवाद,गैरसमज याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि गरम चर्चा ऐवजी उमेदवार विजयाकडे बघितले पाहिजे हे मतदारांचे म्हणणे आहे.



