Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — कर्तव्यदक्ष तथा पक्षासी निष्ठावंत राहिलेल्या विलास मोहीनकरांचा अचानक...

ब्रेकिंग न्यूज… — कर्तव्यदक्ष तथा पक्षासी निष्ठावंत राहिलेल्या विलास मोहीनकरांचा अचानक पक्ष पदांचा राजीनामा… — प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे राजीनामा सादर… — मन शुन्य करणारी घटना….

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

          जेष्ठ,अनुभवी,जागरूक पत्रकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा फिशरमेन अध्यक्ष तथा चिमूर तालुका सरचिटणीस विलास मारोती मोहिनकर यांनी आज आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिलाय.त्यांच्या राजीनाम्यामुळे एका निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गमावले असल्याची चर्चा सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे.

         त्यांनी आपल्या पक्ष पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काॅंग्रेस फिशरमेन,चिमूर तालुका अध्यक्ष यांच्याकडे पाठवला आहे.त्यांनी राजीनामा मंजूर करण्याची विनंती वरिष्ठांना केली आहे.

        भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या फिशरमेन जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर तथा तालुका सरचिटणीस चिमुर या पदावर काम करताना विलास मोहीनकर यांनी पदाला न्याय दिला.

         पक्षासी एकनिष्ठ राहात विलास मोहीनकर यांनी पक्षाचे व पक्ष पदाधिकाऱ्यांचे हित सातत्याने जोपासले आणि पक्षाच्या बळकटीसाठी तत्परतेने काम केले.

           विलास मोहीनकर सारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना गमावने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने बरोबर नसल्याचे जनमत आहे.

             विलास मारोती मोहिनकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की,माझ्या वैयक्तीक कारणास्तव मी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी फिशरमेन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा चिमुर तालुका सरचिटणीस पदाचा राजीनामा स्व.ईच्छेने देत आहे.

           विलास मोहीनकर हे बऱ्याच वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात कार्यरत होते.ते शांत,अनुभवी,प्रामाणिक आणि पक्षासी एकनिष्ठ होते.अशा पदाधिकाऱ्यांना गमावने हे पक्षाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.

         विलास मोहीनकर यांच्या राजीनाम्याचे कारण काहीही असो,पण पक्ष श्रेष्ठींनी निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना जपले पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.