दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग धरत असून आज दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी एकूण 42 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी ही माहिती दिली.
दि.10 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत रोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन स्वीकारले जात असून पक्षनिहाय तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपाचे माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल केले आहे. दरम्यान, नगरसेवक पदासाठी 39 अर्ज दाखल झाले असून यामध्ये माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, सागर भोसले, माजी नगरसेवक दिनेश घुले, लक्ष्मीबाई कवितके, शिवसेनेच्या संगिता राहूल चव्हाण, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे, सचिन घुंडरे व हेमंत कुऱ्हाडे यांचे अर्ज दाखल झाले आहे. आजपर्यंतच्या एकूण नामनिर्देशनांची संख्या 42 वर पोहोचली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचे सांगत, उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी केले.
आळंदी नगरपरिषदेसाठी नगरसेवक पदासाठी ३९ अर्ज पुढील प्रमाणे…
प्रभाग क्रमांक १ अ कवितके लक्ष्मीबाई मारुती (अपक्ष)
प्रभाग क्र.१ ब घुंडरे सचिन रामचंद्र (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. २ ब भोसले सागर तुळशीराम (अपक्ष)
प्रभाग क्र. ३ अ गोगावले आशा आशिष (पक्ष)
प्रभाग क्र.३ ब योगेंद्र गोपाळ कुऱ्हाडे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ४ अ कुऱ्हाडे वैशाली अनिल (पक्ष)
प्रभाग क्र. ४ अ कुऱ्हाडे पुजा अनिकेत (अपक्ष)
प्रभाग क्र. ४ ब येळवंडे किरण रामभाऊ (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ४ ब कुऱ्हाडे योगेश चंद्रकांत (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ४ ब गायकवाड गौरव विठ्ठल (अपक्ष)
प्रभाग क्र. ५ अ बनसोडे ज्ञानेश्वर विष्णु (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ५ ब कुऱ्हाडे अक्षदा रोहन (अपक्ष)
प्रभाग क्र. ६ अ साक्षी अक्षय कुन्हाडे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ६ अ लतिका ज्ञानेश्वर वाघमारे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ६ ब हेमंत गुलाब कुन्हाडे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. ६ ब समीर आप्पासाहेब कुऱ्हाडे (अपक्ष)
प्रभाग क्र. ६ ब प्रसाद सुभाष बोराटे (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ अ सचिन रामदास गिलबिले (पक्ष)
प्रभाग क्र. ८ अ भागवत नारायण आवटे (पक्ष)
प्रभाग क्र. ८ ब सविता राजेंद्र बोत्रे (पक्ष)
प्रभाग क्र. ९ अ दिनेश रामदास घुले (पक्ष)
प्रभाग क्र. ९ ब कन्याकुमारी विश्वभंर शिंदे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. १० अ झोंबाडे सुरेश खंडेराव (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. १० अ ज्ञानेश्वर प्रकाश वाघमारे (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. १० ब चव्हाण संगिता राहूल (पक्ष)
प्रभाग क्र. १० क काळे प्रज्ञा सचिन (पक्ष व अपक्ष)
प्रभाग क्र. १० क सुवर्णा दत्तात्रय काळे (पक्ष)



