शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.यामुळे लोकहितासाठी चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्यत्वाची निवडणूक लढण्याचा निर्धार सातारा ग्रामपंचायतचे युवा सरपंच गजानन धनराज गळधे यांनी केला आहे.
ते मासळ – मदनापूर जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले असून त्यांनी मासळ-मदनापूर सर्कलमध्ये जनसंपर्क वाढवला आहे.
सरपंच गजानन धनराज गुुळधे यांनी गट ग्रामपंचायत साताराचा पदभार सांभाळताना ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत लोकहितासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.
सरपंच गजानन गुळधे हे एक उमदा,मनमिळावू,कर्तव्यदक्ष व्यक्तीत्व म्हणून अलिकडच्या काळात लोकांसमोर आले आहेत.
तद्वतच ते भाजपचे चिमूर तालुका पदाधिकारी असल्याने आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचा आशीर्वाद त्यांना मिळू शकतो अशी जनचर्चा आहे.
जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असल्याने नागरिकांच्या हिताची बरीच कामे केली जातात याची जाणीव सरपंच गजानन गुळधे यांना आहे.
म्हणूनच गजानन गुळधे हे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य असा राजकीय प्रवास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.



