Home Social जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे दि. 27 मे 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

         त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला वनिता भिमटे पळसगांव,आशा अलोने गोंडमोहाडी यांच्या हस्ते पुष्प अर्पण केले व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

        याप्रसंगी प्रदीप मेश्राम यांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ देणाऱ्या,बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

          या मातेने आपल्या इच्छा – आकांक्षाना मूठमाती देऊन बाबासाहेबांना समाजहीतासाठी लढण्यास प्रोत्साहित केले.माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता,अशा शब्दात मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. 

      याप्रसंगी गीता मेश्राम,विद्या रामटेके,प्रेमिला गजभिये,वनिता बोरकर,गीता मेश्राम ,गहिनाबाई बांबोडे,आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले व आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.