Home Maharashtra भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य आणि स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट...

भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य आणि स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्यासंबंधाने रोहन कळसकर यांनी केली मागणी…. — शासन स्तरावर निर्णय अप्राप्त असल्याची चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती….

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य आणि स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्याबाबतचे निवेदन,,मुख्यमंत्री, (यांचे खाजगी सचिव) महाराष्ट्र शासन,मंत्रालय मुंबई-.32,,शालेय शिक्षण मंत्री मंत्री, (यांचे खाजगी सचिव) महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई-.32, यांना चंद्रपूर जिल्हातंर्गत बल्लारपूर येथील श्री.रोहन जयंत कळसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत पाठवले होते.

      भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य आणि स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्याबाबत,श्री.रोहन जयंत कळसकर अध्यक्ष झांशी राणी सांस्कृतिक मंडळ,बल्लारपुर जिल्हा चंद्रपुर यांचा अर्ज दिनांक 20/04/2026 होता.

       त्यांनी उपरोक्त संदर्भीय निवेदनाचे विषयान्वये,श्री रोहन जयंत कळसकर अध्यक्ष झांशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपुर,जिल्हा चंद्रपुर यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य आणि स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्याबाबत निवेदन चंद्रपूर जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले आहे.

      सदर पत्राची मूळ प्रत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रमेश शामराव आवारी,(सामान्य) यांनी दिनांक १० में २०२६ ला,मुख्यमंत्री,(यांचे खाजगी सचिव) महाराष्ट्र शासन,मंत्रालय मुंबई-.32,आणि शालेय शिक्षण मंत्री मंत्री,(यांचे खाजगी सचिव) महाराष्ट्र शासन,मंत्रालय मुंबई-.32, यांना श्री.रोहन कळसकर यांच्या निवेनाची प्रत पुढील कार्यवाही करीता सविनयपणे सादर केली आहे.

      त्या संबंधातील सहपत्र श्री. रोहन जयंत कळसकर अध्यक्ष झांशी राणी सांस्कृतिक मंडळ,बल्लारपुर जिल्हा चंद्रपुर यांना माहितीस पाठवले आहे.

निर्णय अप्राप्त…..

        श्री.रोहन जयंत कळसकर, रा. विवेकानंद वार्ड,बललारपूर,जि.चंद्रपुर,यांच्या दिनांक ०८/०५/२०२६,च्या Online RTI या संगणक प्रणालीवर प्राप्त अर्जाचे निराकरण करण्याबाबत माहिती घेतली.

         मात्र उपरोक्त संदर्भीय विषयान्वये,मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री (यांचे खाजगी सचिव) महाराष्ट्र राज्य-32 यांना पाठविलेले मार्फत पत्र क्रसाशा/कार्या-10/ग्रा.म.अ./निवेदन/2026/366 इ.ऑफिस न.1648272 असे आहे.

       त्याअनुषंगाने शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय अप्राप्त आहे,असे Newate तहसिलदार (सामान्य) तथा जनमाहिती अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपुर यांनी श्री.रोहन कळसकर यांना लेखीद्वारे कळवले आहे.

          याबाबत प्रतिलिपी जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांना महितीस सविनय सादर केले आहे.