Home Political चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे विजयी…

चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे विजयी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक संचालक पदाची निवडणूक लढविली होती.

     श्री.मंगेश धाडसे हे चंद्रपूर विभागातून विजय झाले आहेत.ते आता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत संचालक झाले आहेत.

         त्यांच्या विजयाबद्दल आमदार किर्तीकुमार भांगडीया,चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,भाजपा मित्र परिवार,व कौटुंबिक सदस्यांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांचे अभिनंदन केले आहे.