Home Maharashtra आरमोरी येथे तालुका व्हाइस ऑफ मिडिया चे वतीने लोगो चे अनावरण…

आरमोरी येथे तालुका व्हाइस ऑफ मिडिया चे वतीने लोगो चे अनावरण…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- व्हाइस ऑफ मिडिया महाराष्ट्र राज्य अधिवेशन चे अनुषंगाने आरमोरी तालुका शाखेच्या वतीने लोगो चे अनावरण करण्यात आले. त्यावेळी आरमोरी विधान सभा माजी आमदार आनंदराव गेडाम, अमोल मारकवार माकपा, डॉ.महेश कोपुलवार भाकपा, संदीप ठाकूर जिल्हाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट), विनोद बेहरे सुवर्णकर, रणजीत बनकर मनसे, मनोज पांचलवार उप सरपंच,नंदुभाऊ पेठेवार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,प्रकाश खोब्रागडे भाकपा यांचे हस्ते व्हाॅईस ऑफ मिडीयाच्या पंढरपूर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण आरमोरी येथील पत्रकार संघाचे कार्यालयात करण्यात आले.सर्वांनी शुभेछा प्रदान केल्या.

        यावेळी व्हाॅईस ऑफ मिडीया तालुका अध्यक्ष ऋषी सहारे , कार्याध्यक्ष दौलत धोटे,उपाध्यक्ष सुरेंद्र बावनकर, सचिव राजेंद्र मोटघरे, मिडिया प्रमुख सुरेश कांबळे, सल्लागार भिमराव ढवळे, रोहिदास बोदेले, प्रा. भाग्यवान मेश्राम उपस्थित होते.