Home देशविदेश पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांची रखेल?

पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांची रखेल?

      गेल्या चार दिवसापूर्वी RSS ने औरंगाबाद येथे कॅम्प लावून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांसमोर सदस्य नोंदणी चालू केली होती.एक तर RSS नोंदणी नसलेली संस्था आहे.त्यामुळे तीला कोणते संविधानिक अधिकार पोहोचतात का?लोकांना,विद्यार्थ्यांना सदस्य नोंदवण्यासाठी?तेही महाविद्यालयाच्या गेटवर!

       ज्या शाळेला,महाविद्यालयाला,संस्थांना,शासनाच्या तिजोरीतून 100% अनुदान मिळते.अशा ठिकाणी कोणत्याही धर्माचे शिक्षण देता येत नाही.या कायद्याचे उलंघन केले तर संबंधित शाळेवर, महाविद्यालयावर,फौजदारी गुन्हा दाखल करून त्या संबंधित संस्थेची मान्यता रद्द करता येते.

             शिवाय,त्या शिक्षणसंस्थेच्या 100 मीटर परिसराच्या आत कुणालाही मादक पदार्थाची ( तंबाखू, गुटखा पुड्या,दारू,सीगारेट इ.) विकता येत नाही.हा नियम आहे.!

       असे असतानाही या मादक पदार्थांपेक्षाही घातक असलेला RSS चा धार्मिक अजेंडा तिथे कसा काय प्रचार करू शकतात?

        म्हणून आमचे मीत्र वाहूळ सरांनी एकट्याने त्या RSS च्या नोंदणीला विरोध करून त्यांना तिथून गाशा गुंडाळायला भाग पाडले….!

        तर RSS ने त्यांच्या विरोधात गुन्हा फिर्यादी म्हणून नोंदवायला पाहिजे होता.परंतू ,तसे न होता पोलिसांनीच स्वतः फिर्यादी म्हणून वाहूळ सरांविरोधात गुन्हा नोंद केला!

         याचा अर्थ RSS चे प्रकरण कोर्टात गेले तर कदाचित ते RSS च्याच अंगलट येईल म्हणून महाराष्ट्राचे EVM मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फसणवीस यांनी पोलिसांना ( आपल्या रखेलीला ) पुढे करून तीच्या पदराआडून RSS ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत!

         परंतू ,एक लक्षात घ्या RSS वादी,संविधानविरोधीवाल्यांनो जंगलात आग लागल्यावर जंगली प्राणी मानवी वसतिकडे कूच करतात.अगदी तसेच तुमचे होत आहे. ‘तुमची शंभरी भरली आहे.” विनाशकाले विपरीत बुद्धी तुमची झाली आहे……

          हा देश निसर्गनियमावर चालणारा आहे.जगा आणि जगू द्या या तत्वावर चालणारा देश आहे.लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर चालणारा देश आहे.माणूस म्हणून प्रत्येकजण कर्तव्यातून सिद्ध होणाऱ्यांचा देश आहे.

          केवळ मतचोऱ्या करून सत्तेत बसून पोलिसांना आपले गुलाम बनवून मनमानी करून राज्य किंवा देश चालवीण्याचे मनसूबे आता बंद केले पाहिजेत.पश्चिमात्य देशाप्रमाणे आमच्या देशात क्रांती होऊ शकत नाही.या भ्रमात राहू नका.आता…..

      आम्ही भारताचे लोकं म्हणून ही सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे…..

          आता यापुढे जिथे कुठे महाराष्ट्रात आणि देशात RSS नोंदणीचे कॅम्प शाळेच्या,महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसराच्या आत दिसतील.ते उध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.आणि वाहूळ सरांच्या पाठीमागे आम्ही सर्वजन सोबत आहोत.

           आवाहनकर्ता…

           अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…