ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी यांच्या सौजन्याने मंडईचे औचित्य साधून दि.२४ आक्टोबर २०२५ रोजी समाज मंदिर बाजार चौक एकोडी येथे स्मृतीशेष प्रबोधनकार मनोज कोटांगले यांना समर्पीत सं. अर्ध्यावरती डाव सोडीला या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.
या नाटकाचे निर्माता ग्रा.पं.सदस्य सुकराम बन्सोड असून दिग्दर्शन ग्रा.पं.सदस्य भावेश कोटांगले यांनी केले आहे. कमलाकर चांदेवार, फिरोज कोटांगले, कैलाश जांभूळकर, तोषांत भाष्कर, राधेश्याम नेवारे, अमित भैसारे, टिकाराम द्रुगकर, बाल कलाकार अंथाग तुमसरे, स्त्रि कलावंत मीस प्रिती, स्वाती, अर्चना, काजल यांनी भूमिका साकारल्या असून नाटकाचे उदघाटन वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते, प्रविण भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.
यावेळी माजी जि.प.सदस्या माहेश्वरी नेवारे, सभापती ललित हेमणे, सरपंच संजय खोब्रागडे, नंदकिशोर समरीत, विजय नंदागवळी, प्राचार्य अभय बन्सोड धम्मशिल नंदेश्वर, अॅड. सुरेश रामटेके, परमानंद मेश्राम, मंदार खेडीकर, शिलकुमार वैद्य, आर. एस. डोंगरवार आदी उपस्थित राहतील.
नाटकाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलाश जांभुळकर, कार्तीक मेश्राम, सुखराम जांभुळकर, टिकाराम द्रुगकर, हुसेन मेश्राम, भावेश कोटांगले, तिर्थानंद बोरकर आदींनी केले आहे.



