Home कृषी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मका खरेदी केंद्रांना गती :- आमदार रामदास मसराम यांची...

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मका खरेदी केंद्रांना गती :- आमदार रामदास मसराम यांची अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक”…

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

           तालुक्यातील तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रामदास मसराम यांनी जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा विपणन अधिकारी बिसने व प्रादेशिक विपणन अधिकारी सावळे उपस्थित होते.

         बैठकीत संपूर्ण विधानसभेत तसेच गडचिरोली जिल्ह्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य दरात विक्री करता यावी व अनावश्यक त्रास टाळावा, यासाठी अधिकाधिक खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

          आमदार मसराम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेऊन मका खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळेल व त्यांची गैरसोय टळेल, असे त्यांनी नमूद केले.

         तसेच, डीएमओ जिल्हा विपणन अधिकारी बिसने व एसआरएम प्रादेशिक विपणन अधिकारी सावळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले.

          या बैठकीमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच मका खरेदी केंद्रांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.