युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
एक उदार दात्याने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा दारापूर उर्दू शाळेला भेट दिली. शाळेची पाहणी करून व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्या उदार दात्याने चंडिकापूर येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 80 हजार रुपये किंमतीच्या 20 सायकली अमरावती येथिल बाहेती इंटरप्रायजेस येथून खरेदी करुन चंडिकापूर वरुन दारापूर येथे उर्दू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना (नाव प्रकाशित ‘न’करण्याच्या अटीवर ) दान दिल्या.
सायकलींच्या खरेदीवेळी शाळेचे मुख्याध्यापक साबीर शाह, पदवीधर शिक्षक कलीम खान, डी. आर. जामनिक, अब्दुल सिद्दीकी यांनी खरेदी करून गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या या उदार दानदात्याचे दारापूर येथिल पूर्व माध्यमिक शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.



