Home Maharashtra अनेक झाडांची कत्तल,मात्र वनविभागाचे अधिकारी अनभिज्ञ!… — तोडलेली झाडे उचलून नेल्यावरच...

अनेक झाडांची कत्तल,मात्र वनविभागाचे अधिकारी अनभिज्ञ!… — तोडलेली झाडे उचलून नेल्यावरच पोहचणार मोका स्थळावर वनाधिकारी?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक

         स्वत:च्या फायद्यासाठी मोठमोठ्या झाडांची कत्तल कशी करावी हे त्या नागपूरच्या मुजोर व्यक्तींला माहिती आहे आणि झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करुन झाडांची कत्तल करणाऱ्या त्या व्यक्तीला साथ कशी द्यायची हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे..

             विना परवानगी व बेकायदेशीर झाडे तोडणारा मुजोर व्यक्ती कत्तल केलेली झाडे उचलून नेल्यावरच चिमूर तालुक्यातील वनाधिकारी मोका स्थळावर पोहचतील हे पक्के आहे.

                कारण झाडांची सर्रास कत्तल करणाऱ्या नागपूरच्या त्या व्यक्तीसोबत चिमूर व भिसी वनाधिकाऱ्यांचे गोपनीय संबंध असावे अशीच त्यांची कृती असल्याचे दिसून येते आहे…

                हा झाडांची कत्तल करणारा व्यक्ती विना परवानगीने शेतातील,नदी थडव्यावरील व रोडवरील झाडे मागील अनेक वर्षांपासून तोडून नागपूरला नेतो आहे.तरीही वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यां कर्तव्याची जाग येत नाही,याला काय म्हणावे?