Home Maharashtra नवेगाव बफर गेट बंदसाठी नागरिक धडकले प्रवेशद्वाराजवळ…. — संतप्त गावकऱ्यांनी केले...

नवेगाव बफर गेट बंदसाठी नागरिक धडकले प्रवेशद्वाराजवळ…. — संतप्त गावकऱ्यांनी केले पाच तास ठिय्या आंदोलन….

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

चिमूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या बरडघाट,पांढरपौनी,आणि झरी गावातील नागरिकांनी,वन विभागाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता नवेगाव निसर्ग पर्यटन गेटवर आंदोलन केले.

        यापूर्वी ६ ऑक्टोबरला निवेदन देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास गेट बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता.

       १) बरडघाट,पांढरपौनी,आणि झरी गावांचा बफर झोनमध्ये समावेश करावा.२) शेतजमिनींना जाळीचे कुंपण आणि पडीत जमिनींसाठी प्रती एकर ५० हजार रुपये भाडे द्यावे.३) वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदोबस्त करावा. ४) स्थानिक बेरोजगारांना जिप्सी मार्गदर्शक म्हणून रोजगार द्यावा.

५) पाळीव प्राणी आणि मानवी हानीसाठी तात्काळ नुकसानभरपाई द्यावी,आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

        माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी,महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वाद्ये वाजवत,घोषणाबाजी करत गेटवर ठिय्या दिला. 

        आंदोलकांनी सहाय्यक वनसंरक्षक साईतन्मय दुबे आणि खडसंगी वन परिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांच्याशी चर्चा केली.दुबे यांनी नुकसानभरपाईचे आश्वासन दिले.परंतु इतर मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे सांगितले.

           आंदोलकांनी लेखी आश्वासनापर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेत भजने सुरू केली.

         पाच तासांनंतर उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक आणि प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

       त्यांनी तीन गावांचा बफर झोनमध्ये समावेश करण्यासाठी तीन दिवसांत प्रस्ताव पाठवण्याचे आणि पडीत जमिनींसाठी प्रति एकर ७ हजार रुपये देण्याचे प्रावधान असल्याचे सांगितले.

        आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी चिमूर,शेगाव,आणि भिसी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसर आणि पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

        आंदोलनात आदित्य वासनिक,जगदीश मेश्राम,विनोद उमरे,रोशन बन्सोड,संदिप भोस्कर,मनी रॉय,योगेश गेडाम,रवी कोलते,प्रभाकर दोडके,रामभाऊ मेश्राम,अर्जुन पाटील थुटे,पवन धुर्वे,श्रीकृष्ण कुळसंगे,रामदास आत्राम,बंडूजी तराडे,शामकला कुडसंगे,नागाबाई चुडाम,सिंधु कुमरे,संगीता दोडके,उषा धुर्वे,मंजुळा बावणे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले.