अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- परतवाडा ते अमरावती या बस प्रवासादरम्यान एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी गेलेल्या मालाची किंमत सुमारे ₹२,२०,००० इतकी असल्याचे फिर्यादीच्या जबानीवरून स्पष्ट झाले आहे. फिर्यादी महिला धारणी येथील सदरबाडी येथे नोकरीवर असून त्या नियमितपणे परतवाडा–अमरावती दरम्यान प्रवास करतात.
दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ०८.४१ वाजता त्या परतवाडा येथून अमरावतीकडे येणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होत्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने शेगाव नाका येथे उतरल्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता पर्स गायब झाल्याचे लक्षात आले.
पर्समध्ये १५०० रुपये रोख, २० ग्रॅम सोन्याचे कडे, तसेच १५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ₹२.२० लाखांचा मुद्देमाल होता. महिलेने तत्काळ गाडगेनगर पोलिस ठाण्यात हजेरी लावून तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३०५(क) बी.एन.एस. तसेच कलम ३८० भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदविला आहे.


