अबोदनगो एस.चव्हाण
दखल न्युज भारत
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती :- मोझरी बसस्थानकाजवळ एक चोरीचा प्रकार उघडकीस आला. नंदकिशोर मारोतराव कुटे (वय ५३, रा. ममदापुर, शिरपुटणी, ता. आष्टी, जि. वर्धा) पितरच्या कार्यक्रमासाठी आनंदवाडी येथे आले होते.
कार्यक्रम संपविल्यानंतर त्यांनी तुकडोजी महाराज समाधी दर्शन घेऊन तळेगाव श्यामजीपंतकडे जाण्यासाठी एस.टी. बसमध्ये प्रवास सुरू केला. बसमध्ये प्रवास करत असताना फिर्यादीला खिशात कुणीतरी हात लावल्याचा संशय आला. त्यांनी तपासले असता त्याचे पॅन्टमध्ये असलेले ६,००० रुपये चोरी झालेले आढळले. आरोपी सैय्यद नुर सैय्यद गफारी (वय ४९, रा. अकबर नगर, पो. गाडगेनगर, अमरावती) सुमारे त्या वेळेस जाताना दिसून आला. फिर्यादीने “चोर! चोर!” असे ओरडले.
बसस्थानकावर तैनात पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीला ताब्यात घेतले व तिवसा पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. पोलिसांनी कलम ३०३(२), ३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.


