Home Crime रतनगंज येथे घरातून एकूण १२ धारदार स्टीलच्या पात्यांच्या तलवारी जप्त…  —...

रतनगंज येथे घरातून एकूण १२ धारदार स्टीलच्या पात्यांच्या तलवारी जप्त…  — रहीम खान उर्फ गोटीवाला याच्या राहत्या घरावर छापा…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

अमरावती :- शहर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट परिसरातील रतनगंज येथे छापा टाकून घरातून एकूण १२ धारदार स्टीलच्या पात्यांच्या तलवारी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.

         गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रतनगंज भागात अवैध शस्त्रसाठा असल्याची खात्री करून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रहीम खान युसुफ खान (वय ४२ वर्षे), उर्फ रहीम गोटीवाला, रा. रतनगंज, अमरावती याच्या राहत्या घरावर छापा टाकला. तपासादरम्यान घरातून एकूण १२ धारदार स्टीलच्या पात्यांच्या तलवारी जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी तलवारीची किंमत सुमारे दोन हजार रुपये असून एकूण २४ हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे.

         या प्रकरणात आरोपी रहीम गोटीवाले याच्याविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्ट कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मनीष वाकोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

         या पथकात हेडकॉन्स्टेबल सतीश देशमुख, हेडकॉन्स्टेबल फिरोज खान, पोलिस कॉन्स्टेबल सुरज चव्हाण, शेख नाझीम आणि रणजित या गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत.