Home Maharashtra बोललेल्या शब्दानुसार वागत नाही ना!,”मग,शेतकऱ्यांनी सरकार पाडणे शिकले पाहिजे….

बोललेल्या शब्दानुसार वागत नाही ना!,”मग,शेतकऱ्यांनी सरकार पाडणे शिकले पाहिजे….

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटे व अतिवृष्टीचे संकटे येत असताना जे सरकार त्यांना समजून घेत नाही आणि वेळेवर आर्थिक मदत करीत नाही,त्या सरकारला सार्वत्रिक निवडणूकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाडणे शिकले पाहिजे आणि शेतकऱ्यांचा कुठल्याही राजकीय पक्ष नाही याची जाणीव त्यांनी करुन घ्यायलाच हवी.

      सत्तापक्षांच्या विचारातंर्गत भावनांचा बाजार हा शेतकऱ्यांना वारंवार निराशाच्या घाईत लोटणारा असेल तर असे सरकार काय कामाचे?हा प्रश्न आता शेतकऱ्यांनी मनात कायमचा कोरलेला बरा!

       अतिवृष्टीमुळे सर्व पिकांची उत्पादन क्षमता घटने आणि अर्धा पेक्षा कमी उत्पादन होणें म्हणजेच सरकारच्या निकषानुसार ओला दुष्काळ जाहीर करणारी कार्यपद्धत!

            पण,नैसर्गिक संकटाला अनुसरून शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक हातभार लावायचा नाही किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी बोलल्याप्रमाणे करायची नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जगजाहीर धोरण असल्याने व त्यांचे सरकार हे शेतकऱ्यांची पिळवणूक करणारच!

           म्हणूनच शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे,भावनीक बाता करणाऱ्या राजकारण्यांना दूर ठेवले पाहिजे…

      विशेषतः भाजप मित्रपक्षाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कधीच देत नाही आणि नैसर्गिक संकटाला अनुसरून वेळेवर आर्थिक मदत करीत नाही.

       म्हणूनच भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव सर्व निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि त्यांना धक्क्यावर धक्का दिला पाहिजे असीच त्यांची विचित्र कार्यप्रणाली आहे.

       सफाईने बोलने आणि वेळ मारुन नेने हे भाजपाचे धोरण असल्याने त्यांच्या अशा वेळकाढू चालींना शेतकऱ्यांनी वेळीच ओळखले पाहिजे.

        जे सरकार शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक हातभार लावतय आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देतय,तेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे,हे शेतकऱ्यांनी वेळीच ओळखले पाहिजे.