Home उपक्रम ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे सिद्धबेट परिसरात स्वच्छता उपक्रम…

ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे सिद्धबेट परिसरात स्वच्छता उपक्रम…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे सिद्धबेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.भाविकांची वर्दळ असलेल्या या पवित्र स्थळाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवावा, या उद्देशाने संस्थानकडून हा उपक्रम घेण्यात आला.

        यावेळी संस्थानचे विश्वस्त, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर घाण काढून परिसर स्वच्छ केला.

         या वेळी संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी सांगितले की, “सिद्धबेट हे ज्ञानेश्वर माऊलींच्या संप्रदायातील अतिशय पवित्र स्थळ आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे मत विश्वस्त लोंढे यांनी व्यक्त केले.

         ‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे घेतलेला हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.