भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
प्रांगणात,69 वा धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी पंचशील ध्वजारोहण करण्यात आला धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमाचे अध्यक्ष वृषिजी माशाखेत्री होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वानखेडे सर, अभय इंदुरकर, नाजुकराव उंदिरवडे, खुशाल ढवळे, देवनाथ माशाखेत्री, नगरसेविका अलकाताई माशाखेत्री, रजनी ताई माशाखेत्री मंचावर उपस्थित अभय इंदुरकर , निकोसे सर यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.
डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केलेत सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून धम्म रॅलीचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला बौद्ध समाजातील नागरिक व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मयूर माशाखेत्री यांनी केले.



