भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
पहादी पारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ संलग्न,गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समिती, परसवाडी ता.धानोरा जि. गडचिरोली यांच्या तर्फे रावण महोत्सव व दसरा (शस्त्र) पूजा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गोंडी देवी देवतांची महापुजा दसऱ्याच्या दिवशी दोन आक्टोबर ला करण्यात आली.
देशभरात दसऱ्याच्या दिवशी वाईट प्रवृत्तीवर विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते परंतु गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील परसवाडी हे गाव अपवाद आहे. या गावात रावणाचे दहन होत नसून रावणाची पूजा केली जाते परसवाडी गावाने ही अनोखी परंपरा जवळपास 40 वर्षापासून जपली आहे.
रावणाला खलनायक ठरवून त्याचे दहन केले जात असताना परसवाडी येथील आदिवासी बांधव रावणाला देव म्हणून त्याची पूजा केली जाते. त्यासाठी परसवाडीत रावणाचे मंदिर उभारले आहेत आदिवासी समाजाची परंपरा संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.



