जगातील 70 टक्के माणसांचे विचार हे काल्पनिक आहेत,आपल्या भारत देशात तर त्याहीपेक्षा जास्त आहेत.हे सर्व कल्पनेच्या जगात वावरत असतात.कारण विचारातच काल्पनिकता असेल तर आचरण पण तसेच असणार हे नक्कीच.जसे विचार तसे आचार,तसा विश्वास,जसा विश्वास तशी मान्यता,तशी श्रद्धा आणि भक्ती असणारच.
कल्पना म्हणजे वास्तव नव्हे,खरे नव्हे,आणि जे सत्य नाही,ते खोटेच असते.कल्पना म्हणजे आभास,कल्पना म्हणजे स्वप्न.स्वप्न, कल्पना,संकल्पना हे सारे मनाशी संबंधित गोष्टी आहेत.मनाचा स्वभाव ,गुण तर चंचल ,असतील असतो,म्हणजे स्थिर नसते.जे स्थिर नाही,ते वास्तव किंवा सत्य नसते.सत्य म्हणजे चिरंतन,अविनाशी,अखंड,अक्षय. अमर.
अर्थात वरील प्रमाणे कल्पना आणि वास्तव याचा विचार केला तर,देव आणि त्याकडे नेणारी वाट म्हणजे धर्म या दोन्ही गोष्टी कल्पनिकच आहेत.म्हणजे मनाच्या संबंधित आहेत,बुद्धीच्या नव्हे.बुद्धी कल्पना करीत नाही,तर जे काल्पनिक आहे,त्याचा तपास करते,त्यातील सत्यता पडताळून पाहते.चिकित्सा करते.बुद्धीच्या कसोटीवर जे उतरत नाही,ते नाकारते.देव धर्म हे बुद्धीचा विषय नसून मनाचा विषय आहे.अर्थात मनावर विश्वास ठेऊन चालायचे की,बुद्धीवर विश्वास ठेऊन चालायचे ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे असते.
जसे देव आणि धर्माचे,तसेच स्वर्ग नरक,पाप पुण्य,दैव भाग्य, हस्त रेषा पंचांग,स्वर्ग मृत्यू , लाभ हानी , स ट वी , भूत ,राक्षस ,भानामती केगामती, हडळ इत्यादी गोष्टी ह्या काल्पनिक आहेत.सत्यावर आधारित नाहीत.म्हणजेच खोट्या आहेत.ज्या बहुसंख्य लोक मानतात,यावर विश्वास ठेवतात,नव्हे या काल्पनिक गोष्टीनाच खरे मानून एकमेकाशी सारा व्यवहार करतात.म्हणूनच म्हणावे लागते की काल्पनिक विचाराचे हे लोक खोटे बोलतात.याचा जे नाही,त्याला आहे म्हणतात,आणि तसाच ( खोटा ) व्यवहार पण करतात.
काल्पनिक विचाराचे आचरणात स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतात,आणि गरिबीत भर टाकतात.कल्पनेत जगणारे,काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे जग म्हणजे खोटे जग होय.आणि खोट्या जगात वावरणारी माणसे खोटीच असणार,खोटाच व्यवहार करणार,नव्हे करीत आहेत.
परंतु देव धर्म मोक्ष दैव स्वर्ग पातळ ,भूत प्रेत , ज्योतिष्य,इत्यादी या विचार केला तर शेवटी अंधश्रद्धाच ठरतात,ते कसे ? याची चिकित्सा कुणी करत नाहीत.बुद्धी असूनही मनाच्याच तालावर नाचतात.हा मनुष्यातील कमतरता आहे.त्याचा विक पॉईंट आहे.तो सुधारता येतो,पण त्याची इच्छा पाहिजे आणि त्याचे अंगी सत्य स्वीकारण्याचा गुण हवा.प्रामाणिकता हवी.
या सर्व कल्पनांना खतपाणी घालणारे धर्मगुरु,कथाकार,कीर्तनकार असतात.जे स्वतःच अदन्यानी असतात,पण स्वतःला विवेकी समजून इतरांना अंधश्रद्धेचे पाणी पाजत असतात.यात बरेच ढोंगी पण असतात.जी माणसे शिकली सावरलेली,उच्चशिक्षण घेतलेली असतात,ती आपली बुद्धी गुरूकडे ,महाराज, बुवा कडे गहाण ठेवतात.आणि आपले सारे वर्तन खोटे करतात.
जे अस्तित्वातच नाही,त्यास मानायचे,खोट्यालला खरे म्हणायचे ,त्याची पडताळणी करण्याची तयारी पण दाखवायची नाही,अशा व्यक्तींना काय म्हणायचे ? अर्थात कल्पनेची मानसिकता ठेऊन,कल्पनेच्या विश्वात वावरणे म्हणजे एक प्रकारचा वेडेपणाच म्हणावा लागेल.
यात अजून एक काल्पनिक गोष्टीस मान्यता आहे,ती म्हणजे आत्मा आणि परमात्मा.यात पण बरीच जनता रंगलेली आहे.
या सर्व काल्पनिक गोष्टी आणि त्यावर श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा ठेऊन,बाळगून सारे व्यवहार चालतात.म्हणूनच म्हणावेसे वाटते की,काल्पनिक जगातील खोटी माणसे.
टिप: या लेखावर कुणाला काही कॉमेंट्स करायचे असल्यास 9420912209 या माझ्या वॉटसअप वर कराव्यात.स्वागत असेल.कुणाच्या भावना दुखविणे हा हेतू नाही,तर सत्य कल्पनेवर जगणाऱ्यांनी सत्य शोधावे.आर्थिक मानसिक नुकसान करून घेऊ नये,यासाठी हा लेख प्रपंच.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक: 28 सप्टेंबर 2025.फोन: 9420912209.


