Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हटविण्यासाठी RSS चे षडयंत्र……

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हटविण्यासाठी RSS चे षडयंत्र……

    पण ते शक्यच नाही……!

        जर आम्ही ( भारताचे लोकं ) संविधानाच्या मूलभूत हक्कातून जागृत झालो तरच……

       “आता आमच्यातीलच ( संविधानवादीमधील )शत्रूला आम्ही ओळखलं पाहिजेत……

        आता RSS मनुवाद ( संविधान विरोधी शक्ती ) आमच्याही घरात घुसून भेदाच्या भिंती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

         आणि आमच्यातीलच नपुंसक आणि लालची व नकली पदव्यांचे झालर असलेली पांढरपेशी साठी बुद्धी नाठी असलेली परंतू स्वतःला सुशिक्षित समजणारी औलाद सत्ताधाऱ्यांच्या मदतीने आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आमच्याच जीवावर उठली आहे.

           या औलादीने आजपर्यंत आमच्या महापुरुषांचे विशेषतः आमच्या बापाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनभर संघर्ष आणि क्रांतीचे वैचारिक भांडवल करून केवळ साडी, माडी आणि गाडीत मग्न होऊन आमच्या बापाला कलंकित केले.

    “यांनी कधीच वाघाप्रमाणे डरकाळी फोडली नाही…..!

       फोडली असती, तर आज या RSS चा 100 वर्षाचा वटवृक्ष झालाच नसता…….!

         आमच्या बापाने या मनुचे तोंड ठेचून सर्व विष बाहेर काढले होते. परंतू , त्याची थोडीशी वळवळ जिवंत होती. त्यांच्या महापरीनिर्वाणानंतर त्याच मनुच्या वळवळीत पुन्हा जान आली आणि पुन्हा पंचांहात्तर वर्षात हीच मनुस्मृती जागृत झाली…….

          आमच्या या लेकरात याच मनुवाद्यांना पुन्हा ठेचण्याची शक्ती कुणावरही विसंबून न राहता केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या थेट ईशाऱ्यावर आणि संविधानातील मूलभूत हक्कातूनच जागृत व्हावे लागेल. अन्य पर्याय नाही……!

         कारण……

         उद्या दोन आक्टोबर रोजी होणाऱ्या अमरावती येथील RSS च्या दसरा महोत्सवात ऱा. सू. गवई यांच्या पत्नी आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आदरणीय कमलबाई गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. असं जर झालंच………

    तर आम्ही यापुढे कुणावरही भरवसा ठेवणार नाही…….

     या सर्वाना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

       म्हणून आता जातीत जन्मला म्हणून आंबेडकरवादी आहे हे समीकरणच आता आम्हांला बदलावे लागणार आहे.

        आता जात, धर्म न मानता केवळ संविधानवादी आणि संविधानविरोधी या दोनच शक्तीत संघर्ष असणार आहे. या संघर्षात……..

        संविधानवादी शक्तीचाच आम्ही विजय घडवून आणणार आहोत…. 

      त्याचे एक कारण आहे…….

          आमच्या बापाच्या नंतरच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी आणि स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्यांनी RSS च्या दावणीला स्वतः होऊन बांधून घेतल्यामुळे तिसरी पिढी सैरभैर झाली होती. आमच्या राजकीय नेत्यात अनेक रामदास आठवले आणि नरेंद्र जाधव निर्माण होताहेत.

          येनकेन मार्गाने अनैतिक मार्गाने थोडा पैसा आला की राष्ट्रीय अध्यक्षच बनून भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार किंवा नामदार म्हणून मिरवतोय. आणि निवडणुकीत डिपॉझिट सुद्धा वाचवू शकत नाही.कारण EVM सेटिंग याच्यासाठी थोडीच केलेली आहे. केवळ हाडूक चघळत बसण्याची पाच वर्षाची सोय करून ठेवलेली असते. पाचवर्षानंतर पुन्हा पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे उगवण्यासाठी…….!

          या व अशाच अनेक कारणामुळे आमच्या दिशाहीन व दशाग्रस्त समाजाला कुणावरही विसंबून न राहता स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याशिवाय गत्यंतर राहिलेली नाही.

         आतापर्यंत गेल्या 75 वर्षात RSS ने आमच्यावर कसे अन्याय केले, हे चघळत बसण्यापेक्षा आता आम्ही काय करणार, यावर जोर दिलाच पाहिजे. इतिहासात नेहमी बचावात्मक पवित्रा घेणाराच पराभूत झाला आहे. आणि आक्रमक भूमिका घेणाराच नेहमी जिंकत आला आहे. भलेही षडयंत्र गनिमी काव्याचे असो किंवा कुटनीतीचे असो….!

          आज आमच्या देशात मणिपूर, लडाख, दक्षिण भागात आणि महाराष्ट्रात सुद्धा थोडक्यात एकंदरीत संपूर्ण देशात सर्वसामान्य जनतेत जागृतीची एक सुप्त लाट निर्माण होत आहे. गोदी मीडिया ते दाखवत नाही. म्हणून तीचा उद्रेक आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

          “अल्पसंख्यांक ही अशी स्फ़ोटक शक्ती आहे की तीला जर व्यवस्थेने दुर्लक्षित केले. तर एका दिवसात राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही.”

  –डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

       आमच्या महापुरुषांचा इशारा वरील उदाहरणावरून प्रयोगातून सिद्ध होताना दिसत आहे.

     लडाखमधील आंदोलनाच्या प्रमुख नेत्याला अटक करणे ही केंद्र सरकारची फार मोठी चूक ठरणार आहे. एक दिवस कदाचित असा येईल की आम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीतून सुद्धा जाण्याची वेळ येऊ शकेल.

        केवळ शांतता एवढ्यासाठीच चालू आहे आणि RSS ची शक्ती वाढण्याची प्रक्रिया एवढ्यासाठीच चालू आहे की, हजारो वर्षानंतर प्रथमच 75 वर्षांपूर्वी गुलामीचा काळोख मिटून स्वातंत्र्याचा उगवलेला सूर्य एवढ्या लवकर कसा मावळू द्यायचा…..?

         हा संविधानवाद्यांसमोर नाजूक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आम्ही संविधानवादी शांत आहोत. परंतू , याचाही अंत पाहण्याची चूक व्यवस्थेने करू नये…..!

         सोळाव्या लुईने फ्रेंच आंदोलकांवर गोळ्या घालण्याचे आदेश लष्कराला दिलेले असताना, त्यांनी बंदूकीच्या नळ्या जमिनीकडे केल्या होत्या. हा जागतिक फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास आजच्या EVM केंद्र आणि राज्य सरकारांनी विसरू नये.

      शेवटी…….

        सर्व नकली सुशिक्षितांची संपूर्ण फलटण जरी RSS कडे वळली……

        सर्व लहान मोठे राजकीय पक्ष जरी संविधानविरोधी शक्तीकडे वळले……

          सर्व प्रशासकीय व्यवस्था RSS च्या गुलामीत जरी विरघळली………

    तरी……

 आम्ही भारताचे लोकं

 अजूनही एकत्र आहोत ( अपवाद सोडून द्या )….. 

   कारण…….

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या व आम्हा भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणत्या राजकीय पक्षांवर नाही, ना सनदी अधिकाऱ्यावर नाही. ना ही कोण्या नेत्यावर……..

    ही जबाबदारी केवळ आणि केवळ………

     या जबाबदार सर्वसामान्य भारतीय नागरिकावरच आहे. ती पेलण्यासाठी तो आता सक्षम आहे…….

    म्हणूनच…….

      RSS कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हटवीण्याचे RSS चे षडयंत्र कदापि यशस्वी होऊ देणार नाही.

       जागृतीचा कृतिशील लेखक 

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689