आपल्या देशात काही धर्म आहेत, त्या धर्मात काही जाती आहेत, आणि त्या जातीत विषमता आहे. विषमता म्हणजे आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता आहे. आर्थिक विषमता याचा अर्थ आर्थिक स्तर म्हणजेच वर्ग आहेत. तसेच सामाजिक विषमता म्हणजे जाती अंतर्गत लग्न, दोन जातीतील एकत्र येऊन लग्न करणे हे निषेधार्ह मानल्या जाते. याचा अर्थ आंतरजातीय विवाहाला जातीची मान्यता नाही, किंवा धर्माची पण मान्यता नाही. हिंदू धर्मातील जातीमध्ये तर अस्पृश्यता खाजगी मध्ये अजूनही पाळले जाते. विवाह हे संविधानाच्या कायद्यानुसार होत नसून धर्माच्या कायद्यानुसारच होत असतात. या देशातील लोक येत नाहीत, म्हणजे यांच्यात कोणत्याही गोष्टीत एक वाक्यता नाही, राष्ट्रीय एकात्मता नाही, जातीय किंवा धार्मिक समरसता नाही, सौहार्द, सलोखा, सहजीवन, सहकार्य, दोन जातीत किंवा दोन धर्मात प्रेम, बंधुभाव ही ही आदर्श किंवा उदात्त अशी मूल्य प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत, त्याचे कारण म्हणजे या देशातील जातीव्यवस्था आणि धर्म व्यवस्था आणि त्यातील विषमता हे होय. आर्थिक विषमता हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. कारण आर्थिक विषमता टिकविण्यासाठीच जातीचा आणि धर्माचा उपयोग होत असतो, म्हणून तर या देशातील जाती अस्मिता आणि धर्म अस्मिता नष्ट होत नाही.
या भारत देशात, भारत देशाला अजूनही काही लोक भारत म्हणायला तयार नाहीत, तर त्यांना भारताचे नाव ऐवजी हिंदुस्तान किंवा मुस्लिम स्थान किंवा शीख स्थान किंवा बोडो स्थान किंवा तामिली टायगर स्थान हवे आहे, यासाठी संकुचित विचाराचे या देशातील लोक म्हणजे भाषावाद प्रांतवाद जातीवाद धर्मवाद वंशवाद करणारे लोक आपापल्या परीने हा भारत देश आपल्या नावाने आपल्या ताब्यात कसा असेल ? यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. गणित भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष आणि जाती निरपेक्ष असल्यामुळे अशा लोकांचे प्रयत्न असफल ठरतात. स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय या तत्त्वावर आधारित असलेले आणि लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता असलेले व्यवस्था निर्माण करू पाहणारे हे संविधान संपुष्टात आणण्याचे काम या देशातील जातीवादी आणि धर्मवादी संकुचित विचाराचे लोक करताना दिसत आहेत. त्यांचे प्रयत्न जर सफल झाले तर या देशाचे इंग्रजांच्या सत्तेच्या आधी या देशाची जेवढे तुकडे तुकडे होते तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त या देशाचे तुकडे पडणार हे नक्कीच. आज काही धार्मिक लोक कितीही अखंड भारताचे स्वप्न पाहत असतील तरी, त्यांच्या स्वप्नातच भारताचे विघटन आहे, कारण या देशात काही धर्म आहेत आणि अनेक जाती आहेत, हे सर्व एकत्रित नांदण्याच्या विचारात किंवा विचाराचे नाहीत, या देशातील लोकांना जातीचा आणि धर्माचा भयानक अभिमान आहे, जातीची आणि धर्माची अस्मिता ही देशापेक्षाही त्यांना महत्त्वाची वाटते. आधी जात त्यानंतर धर्म आणि त्यानंतर देश असा हा या संकुचित विचारांच्या लोकांचा प्राधान्य क्रम आहे. म्हणून धर्मवादी लोकांनी कितीही धर्माचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरीही आजचा अखंड भारत हा त्यांच्या कल्पनेनुसार राहूच शकणार नाही. भारताला अखंड ठेवण्याची ताकद फक्त भारतीय संविधानात आहे. कारण या देशातील जाती धर्म आणि संस्कृती याचा विचार करूनच हे संविधान तयार करण्यात आले आहे. जातीतील अमानुषता किंवा अन्यायकारक गोष्टींना तसेच धर्मातील अन्यायकारक गोष्टींना फाटा देऊन जातीची आणि धर्माची अस्मिता जोक जोपासण्याची अटकल या संविधानात आहे, ही अटकल जातीवादी किंवा धर्मवादी संविधानामध्ये असूच शकत नाही, म्हणून धर्मवादी देश हा कधीच अखंड राहू शकत नाही. ज्या देशात अनेक धर्म आहेत त्या देशात तर अखंडता राहणे शक्यच नाही, परंतु ज्या देशात एकच धर्म आहे, तो देश सुद्धा अखंड राहू शकत नाही, कारण धर्मातील जाती किंवा पंथ किंवा परंपरा त्यास आडव्या येणार आहेत. उदा. अनेक मुस्लिम देशात एकच धर्म असून सुद्धा तेथे सिया आणि सुंनी या पंथाच्या मतभेदामुळे भयानक नरसंहार होताना आपण पाहत आहोत. म्हणून धर्म हा अखंड भारताचे स्वप्न साकार करू शकत नाही, उलट असलेला अखंड भारत, त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
या देशात आणि देशातील जनतेत एकही नाही, एकता नाही, समरसता नाही, एकात्मता नाही, याचे कारण जातीची अस्मिता आणि धर्माची अस्मिता. जातीसाठी माती खाण्याची तयारी आणि धर्मासाठी धरावरील शिर कापून हातावर घेण्याची तयारी आहे.” देव,देश, अन धर्मा पायी, शिर घेतले तळ हाती ” असे संस्कार बालमनावर झालेले आहेत.
आधी जातीची अस्मिता त्यानंतर धर्माची अस्मिता आणि त्यानंतर देशाची अस्मिता असा प्राधान्यक्रम या देशातील जनतेत असल्यामुळे केवळ दुसऱ्या राष्ट्राने आपल्या देशावर अतिक्रमण केले तर, तेव्हाच फक्त म्हणजे फक्त लढाईच्या वेळेसच या देशातील लोक एक होतात, लढाई संपली की, आपापल्या धर्माच्या आणि जातीच्या खुराड्यात जाऊन बसतात. फुलपाखरू जसे स्वतःला कोशात बंदिस्त करून घेते, तशी हे भारतातील लोक स्वतःला आपापल्या जातीच्या आणि धर्माच्या कोशात स्वतःला बंदिस्त करून घेतलेले आहेत. ते या कोशाबाहेर पडण्याची त्यांची मानसिकताच नाही. हे देशापुढील फार मोठे संकट आहे. मानवते पुढील पण फार मोठे संकट आहे.
या देशातील वास्तविक व्यवस्था ही जाती धर्माची आहे म्हणजेच विषमतेची आहे, म्हणजेच समतेची नाही, या देशाची व्यवस्था ही विषमतेची जरी असली, तरी योगायोगाने या देशाचे संविधान मात्र समतेचे आहे, म्हणून संविधान आणि कायदे हे समतेकडे नेणारेच आहेत, या कायद्यांनीच अस्पृश्यतेचा कलंक लागलेला या देशाला तो धुतल्या जाणार आहे, या भारतीय संविधानामुळेच देश अखंड राहणार आहे, या संविधानामुळेच व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे, सर्व धर्मांचे संरक्षण पण होणार आहे. मात्र त्यातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा आणि मानवी हत्या संहार हे नष्ट होऊन सर्व धर्माचे शुद्धीकरण होणार आहे. ही गोष्ट अजूनही या देशातील धर्मांध आणि जात्यांद लोकांना लक्षात येत नाही, ही शोकांतिका आहे.
जाती निर्मूलन करणे आणि धर्म हा फक्त खाजगी विषय होणे, धर्म हा प्रत्येकाचा एक खाजगी विषयी समजून तो प्रत्येकाने आपापल्या घरातच पाळणे, तो रस्त्यावर न आणता, त्यास सार्वजनिक स्वरूप न देता जर धर्म पाळला तर दोन धर्मात संघर्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. सार्वजनिक जीवन हे देशाचे असते आणि खाजगी जीवन हे त्या देशातील व्यक्तीचे असते, म्हणून खाजगी आणि सार्वजनिक यातील फरक कळणे आणि तो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा फरक केल्यामुळे आणि तो फरक समजून घेतल्यामुळे त्यातच सर्वांचे कसे हित जोपासल्या जाणार आहे ? हे नक्कीच कळेल. आणि यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी भांडणे मारामाऱ्या आणि हिंसा थांबेल, मालमत्तेची होणारी करोडो रुपयाची हानी थांबेल, देशाची जी मालमत्ता आहे, तिचे पण नुकसान होणार नाही. उदा.एस. टी.,रेल्वेची तोडफोड.कार्यालये,गोदामांची तोडफोड,इत्यादी.
भारताला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्षे झाली, भारतीय संविधानाची थोडीशी अंमलबजावणी पण होत आहे, त्याचे कारण लोकशाहीवादी जनतेचा रेटा असल्यामुळे.
स्वतंत्र भारताने व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच महत्व दिले आहे, तसेच धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनविण्याचे स्वप्न बाळगले आहे, तसेच आर्थिक क्षेत्रात देश समाजवादी बनावा यासाठी पण प्रयत्न चालू आहे झालेले आहेत, लोकशाहीचा स्वातंत्र्य सैनिकांनी स्वीकार केलेला आहे. धर्मनिरपेक्षता लोकशाही समाजवाद असणारी व्यवस्था या देशात निर्माण व्हावी यासाठी लाखो लोकांनी कारागृहात आपले जीवन घालविले, कित्येक हुतात्मे झाले, कित्येकाने आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवली, घरादारांचा मुलाबाळांचा बायका पोरांचा संसाराचा त्याग केला, याची किंमत जर आपण जाती आणि धर्म व्यवस्था न बदलता देणार असलो तर, आपल्यासारखे बेईमान निर्घुण, निष्ठुर,अमानवीय,जनावर आपणच. आपल्यावरील हा कलंक जर आपल्याला पुसायचा असेल, आणि माणूस म्हणून जगायचे असेल तर, आपला देश जाती आणि धर्मावर न चालता तो भारतीय संविधानावर चालला पाहिजे,
बाबासाहेब म्हणाले की, आपल्या देशाचे मुख्य शत्रू दोनच आहेत, ते म्हणजे भांडवलशाही आणि जातीय व्यवस्था. म्हणजेच वर्ग आणि जात नष्ट केल्याशिवाय हा देश संविधानानुसार चालणार नाही.


