राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुम्हार समाज, बोरी (ता. कोरची) यांच्या वतीने श्री नरसिंह भगवान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार श्री रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात आमदार मसराम यांनी भगवान नरसिंह यांच्या धर्मरक्षणाच्या कार्याचा उल्लेख करत समाजात ऐक्य, सद्भावना व प्रगती यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच स्थानिक विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गावकऱ्यांनी विविध समस्यांबाबत आमदार मसराम यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रश्नांवर तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (छ,ग) सुरजित ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष हकीमउद्दिम शेख,राजेंद्र चकधारी, संतराम चकधारी, किरपाराम चकधारी, झरनसिंग चकधारी, काँग्रेस कमिटी चे कार्यकर्ते रवी नंदेश्वर, बोरी सरपंच सावजी बोगा, उपरसपंच मीराबाई काटेंगे, पोलिस पाटील जयश्री दर्रो, प्रवाणशिंग कडयाम, जि. के खान,मुख्याध्यापक सोमनकर सर, इंदूरकर मॅडम, पंकज निकोडे सर, दीपक नरडंगे, अजमत खान उपस्थित होते.



