Home Maharashtra ग्रामपंचायत शंकरपूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा….

ग्रामपंचायत शंकरपूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा….

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी.

    १ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला,तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली.

    त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.ध्वजारोहण माननीय सरपंच श्री.साईश सतीश वारजुकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

        यावेळी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी व विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला.या कार्यक्रमास शंकरपूर गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री.साईश सतीश वारजुकर,उपसरपंच श्री. अशोक ज्ञानेश्वर चौधरी,ग्रामपंचायत सदस्य सौ. सविताबाई चौधरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

        उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. 

       तसेच गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता,पाणी संवर्धन,शिक्षण व सामाजिक एकोपा यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

      कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.संपूर्ण वातावरण देशभक्तीपर घोषणांनी व उत्साहाने भारावून गेले होते.