भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
एस.डी.पुरमशेट्टीवार,पअ दक्षिण धानोरा,आर.एम.नरुले,क्षे.सहा.धानोरा यांना,वन्यप्राण्याची शिकार करुन मांसाची विक्री करण्यात येत असल्याची माहीती प्राप्त झाली.
माहिती नुसार वनपरिक्षेत्र दक्षिण व उत्तर धानोराच्या वनकर्मचाऱ्यांनी विलास वासुदेव उईके,रा.लांगटोला (धानोरा) यांच्या घराची झडती घेण्यात आली.
झडती मध्ये घराच्या बाजुच्या पाणी असलेल्या खड्यामध्ये नॉयलान बारदाना अंतर्गत प्लॉस्टिक पिशविमध्ये वन्यप्राण्याचे मांस ठेवलेले आढळले.
त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चौकशी करुन,विलास वासुदेव उईके रा. लांगटोला (धानोरा),किरपालसिंग भगतसिंग डांगी रा.पेटतुकुम,ता. आरमोरी,किशोरा बाबुराव हलामी रा.धानोरा,महेश भिमराव पावे रा.धानोरा,प्रकाश आनंदराव वाघाडे रा.धानोरा,सुनिल रुषी गावडे रा.पवनी,रमेश रामसिंग मडावी रा.धानोरा या आरोपींना अटक करुन मोका पंचनामा नोंदवुन,त्यांच्यावर वनगुन्हा नोंदविण्यात आला.
सदर आरोपी विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (i) व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 कलम 9, 39, 44, 483, 51, 57 महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 9 ब क इ अन्वये गुन्हा नोंद कार्यवाही करण्यात आली.
पुढील चौकशी रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली,आर्या व्हि. एस.उपवनसंरक्ष गडचिरोली वनविभाग गडचिरोली व अंबरलाल काशिराम मडावी,सहाय्यक वनसंरक्षक (जकास) गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित पुरमशेट्टीवार,वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा, गांगरेड्डीवार क्षे.सहा.,हितेश मडावी,मिलिंद कोडप,कु.सिमा सिडाम,कु.लिना गेडाम,कु.भुमा सय्याम,कु.किरण रामटेके वनरक्षक,त्याचे अधिनिस्त वनपरिक्षेत्र उत्तर व दक्षिण धानोरा येथील वनकर्मचारी चौकशी करीत आहेत.
वन्यप्राण्याची शिकार करण्यात येऊ नये व शिकाऱ्याची माहिती वनविभागास देण्यात यावी असे आव्हान
सुमित दि.पुरमशेट्टीवार वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा परिक्षेत्र धानोरा यांनी केले आहे.

