भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे,कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातंर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ यांची जयंती नुकतीच साजरी करण्यांत आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्धानी इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.राजू किरमीरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यांत आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विणा जम्बेवार,डॉ.गणेश चुदरी,डॉ.पंढरी वाघ,डॉ.हरीष लांजेवार,डॉ.प्रियंका पठाडे,प्रा.मानतेश तोंडरे,डॉ.अविनाश भुरसे यांची उपस्थिती होती.
जयंतीनिमित्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा प्रशांत वाळके यांनी ‘ पंडित दीनदयाल उपाध्याय ‘ यांच्या विचार आणि कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सांस्कृतिक विभागाच्या सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
संचालन व प्रास्ताविक प्रा.प्रशांत वाळके यांनी तर आभार डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी मानले.



