Home Social डॉ.सोमदत्त करंजेकर यांना भारतीय संविधान देऊन केले सन्मानित… 

डॉ.सोमदत्त करंजेकर यांना भारतीय संविधान देऊन केले सन्मानित… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर यांना जन्मदिनाचे औचित्य साधून युवा प्रबोधनकार,कवी,गायक,संगीतकार,तथा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी भारतीय संविधान देत नवजीवन विद्यालय साकोली येथे डॉ.सोमदत्त करंजेकर यांना सन्मानित केले.

        डॉ.सोमदत्त करंजेकर हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात.जिल्ह्यात गणेशोत्सव स्पर्धा,भजन स्पर्धा,क्रीडा स्पर्धा,तथा विविध स्पर्धेचे आयोजन करीत असतात.

       त्यांचा स्वभाव सृजनशील,अत्यंत प्रेमळ असून ते लहान,मोठा हा भेद न करता सर्वांसोबत आदराने व सन्मानाने बोलत असतात.

         सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे आपल्या संस्थे मार्फत सत्कार करून पुन्हा असेच पुरस्कार मिळत राहिले पाहिजे यासाठी भावेश कोटांगले प्रोत्साहित करीत असतात.

       म्हणून त्यांच्या जन्मदिनी भारतीय संविधान देऊन प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी सन्मानित केले.