Home Maharashtra महादवाडी वासीयांना अद्यापही गढुळ पाण्याचा पुरवठा… — ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची...

महादवाडी वासीयांना अद्यापही गढुळ पाण्याचा पुरवठा… — ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची हुलकावणी… — २ सप्टेंबर ला आंदोलन करणार – सरपंच भोजराज कामडी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

      चिमूर तालुकांर्गत मौजा महादवाडी येथील नागरिकांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अद्यापही अशुद्ध होत असल्याने गावकऱ्यांच्या उत्तम आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

      याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूर यांना निवेदनाद्वारे दिनांक ८-८-२५ ला गढुळ पाणी नळाला येत असल्याचे कळविण्यात आले होते.संबंधित वरीष्ठांकडुन उपाययोजना करण्यात न आल्यास ३० ऑगष्टला आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

     परंतु शासकीय सुट्टी असल्याने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले होते.तेच आंदोलन २ सप्टेंबरला करण्यात येणार असल्याचे सरपंच भोजराज कामडी यांनी संबंधितांना कळविले आहे. 

       गावकऱ्यांकडून आरो प्लांट लावण्याची मागणी करण्यात येत आहे.त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूरचे कर्मचारी गावात येऊन चौकशी करतात व हुलकावणी देत वापस जातात असा अजब प्रकार मौजा महादवाडी वासीयांना अनुभवास आला.

        परंतु पिण्याच्या पाण्याचा शुद्धतेविषयी त्यांच्याकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने गावकऱ्यांची बोळवन करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

     यामुळे मौजा महादवाडी वासीयांना शुध्द पाणी प्यायला मिळावे यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोज मंगळवारला आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच भोजराज कामडी व इतर गावकऱ्यांनी चिमूरचे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपविभागीय अभीयंता यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.