Home Political आळंदी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी शुभम धुर्वे यांची नियुक्ती…

आळंदी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी शुभम धुर्वे यांची नियुक्ती…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या आळंदी शहराध्यक्षपदी शुभम धुर्वे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते धुर्वे यांना प्रदान करण्यात आले.

           यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, शरद बुट्टे पाटील, मंडल अध्यक्षा वैजयंता उमरगेकर, संजय घुंडरे, सागर बोरुंदिया, सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, अशोक उमरगेकर, किरण येळवंडे, दिनेश घुले, ज्ञानेश्वर रायकर, आकाश जोशी, अभिषेक उमरगेकर, संकेत वाघमारे, ज्ञानेश्वर बनसोडे, आनंद वडगावकर, प्रीतम किर्वे, अविनाश बोरुंदिया आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

        या प्रसंगी बोलताना नूतन शहराध्यक्ष शुभम धुर्वे म्हणाले,”माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला ही मोठी संधी दिल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे ब्रीदवाक्य ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ याप्रमाणे मी कार्य करेन, आळंदी शहरातील युवा मोर्चाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि भाजपचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रही विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील युवकावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.”

        शुभम धुर्वे यांच्या नियुक्तीमुळे आळंदीतील भाजप युवा मोर्चाला नवचैतन्य लाभणार असून, युवा पिढीला पक्षाशी जोडण्याच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.