ऋषी सहारे
संपादक
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात डी. एस. राठोड फाऊंडेशन, मार्शल योगा अकॅडमी आणि डॉ. सुशील अग्रवाल हेल्प फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात गडचिरोलीचे सुपुत्र, हंसराज उराडे यांना २०२५ चा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानामुळे गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, उपाधीक्षक सदानंद सदाशिव, गगनगिरी मठाचे मठाधिपती बाळकृष्ण गुरव महाराज, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक अशोक पाटील, मराठी चित्रपट अभिनेते संजय मोहिते, डीवायएसपी शिवाजी जमदाडे, डॉ. सुरेश राठोड यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते हंसराज उराडे यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सत्कार करण्यात आला. हंसराज उराडे हे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ग्रामीण भागातील गेल्या पंचेवीस वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पानी अडवा पाणी जिरवा, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी, जलस्वराज्य प्रकल्प, कृषी संधारण, महिला सक्षमिकरण, रोजगार इत्यादि ते शालेय विद्यार्थ्यांना संस्कार, संयम, संगत व राष्ट्रप्रेम यांचे मोलाचे धडे देतात. तसेच तरुणांना शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहित करतात.
त्यांच्या अशा सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यांच्या कार्याचा अनेक महिन्यांपासून अभ्यास केला आहे.
त्यांच्या कार्यशैलीतील निष्ठा, कर्तव्यपरायणता आणि सामाजिक भान यामुळे ते समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. अशा व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजेच समाजात उत्तम कार्य करणाऱ्यांना नवचैतन्य आणि प्रोत्साहन मिळणे होय.”



