शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील रहिवासी कौसल्या नानाजी पिसे यांचे गुरुवारला सकाळी ८.२० वाजता व्रुध्दापकाळाने निधन झाल्याने पिसे परिवारावर शोककळा पसरली आहे.
नेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ च्या दरम्यान अंतीम संस्कार करण्यात आले.
संदीप पिसे भाजपाचे कार्यकर्ते आणि नेरी ग्रामपंचायत चे सदस्य आहेत.तसेच ते नेरी शिरपूर जि.प.क्षेत्र प्रमुख व आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय आहेत.
आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे स्वर्गीय कौसल्या पिसेच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले होते.
तसेच संजय डोंगरे,डॉ.हटवादे,राजू पाटील झाडे,घनश्याम डुकरे,कमलाकर लोनकर,ओम खैरे,सतिश आष्टनकर,भाजपाचे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने अंतीम यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
मृत्युमागे त्यांच्या परिवारात मुले,मुली,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.



