Home Social पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या...

पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा….

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…

         निरा व भीमा नद्यांच्या पट्ट्या मधील पिंपरी बुद्रुक ते नीरा नरसिंहपूर परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय ,,जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालय,आरोग्य कार्यालय व शासकीय कार्यालय आदी सर्व ठिकाणी मान्यवरांच्या व माजी सैनिक , यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

        पिंपरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे साखर कारखान्याचे संचालक व मा.आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत मा. सदस्य प्रवीण बोडके,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी डीगांबर बोडके, तसेच लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय या ठिकाणी पोपट बोडके ,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र लावंड होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दलही ग्रामस्थांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आले.

        नरसिंहपुर ग्रामपंचायत कार्यालय समोर विद्यमान सरपंच अर्चना सरर्वदे सरपंच प्रतिनिधी नितीन सरर्वदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रेम आयर्न फिल्म प्रोडक्शन निर्मिता नितीन नामदेव सरर्वदे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व साहित्य वाटप करण्यात आले.

        चैतन्य विद्यालय या ठिकाणी प्रशांत दंडवते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,अध्यक्षस्थानी संदीप कोरंटक संस्था कार्यवाहक श्रीकांत दंडवते संस्थेचे सदस्य मगनदास शिरसागर माजी प्राचार्य दुनाके सर, पोलीस पाटील अभय कुमार वांगकर सह नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       गिरवी,, येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर विद्यमान सरपंच सौ पार्वती पांडुरंग डीसले उपसरपंच दादासाहेब शिरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सरपंच प्रतिनिधी पांडुरंग डीसले सह सर्व गिरवी ग्रामस्थ उपस्थित होते.

        ओझरे,, येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अंकुश पवार व महादेव ढेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व ओझरे ग्रामस्थ यांची उपस्थित होते.

       गोंदी,, येथील विद्यमान सरपंच रणजीत वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत कार्यालया समोर हनुमंत खटके तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर दत्तात्रेय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.गोंदी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थित होते.

         गणेशवाडी , या ठिकाणी मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याही ठिकाणी गणेशवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         टणु,, येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच तेजस मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर टणु येतील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        सराटी याही ठिकाणी विद्यालया व ग्रामपंचायत कार्यालया समोर कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        सुतार वस्ती या ठिकाणी पिंटू बोडके व भारत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याही ठिकाणी सुतार वस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         लुमेवाडी येथील ध्वजारोहण व लिंबोडी येथील ध्वजारोहण गावातील प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले याही भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        चव्हाण वस्ती ,, आडोबा वस्ती,, डीसले वस्ती आधी ठिकाणी मान्यवरांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          या कार्यक्रमा प्रसंगी श्रीफळ फोडून तिरंगा झेंड्याचे पूजन करण्यात आले. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, राजे छत्रपती शिवाजी महारज यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.

       सर्व ठिकाणी शाळेमधील विद्यार्थ्यांना गणवेश व बक्षीस देण्यात आले.

         या कार्यक्रमासाठी प्रमुख सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके ,’सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, ग्राम पंचायत अधिकारी गणेश लंबाते, सह सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच नरसिंहपुर येतील सरपंच अर्चना सरर्वदे सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे ,पोलीस पाटील ग्रामसेवक सह सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच गिरवी येथील सरपंच पार्वती डीसले,उपसरपंच दादासाहेब शिरसागर,ग्रामसेवक वाघमोडे, सह सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांचीही उपस्थिती होती.

       लुमेवाडी येथील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांचीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         सराटी तालुका इंदापूर येथे ही सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

        गोंदी येथील सरपंच प्रतिनिधी रणजीत वाघमोडे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचीही मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच टणु सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांचीही मोठ्या संख्येने उपस्थित,नरसिंहपुर ,टणु ,गिरवी ,गणेशवाडी ,पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी ,लिंबूडी, ओझरे, आडोबा वस्ती,चव्हाण वस्ती,सुतार वस्ती, डीसले वस्ती,आधी सर्व भागातील ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

          स्वातंत्र दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायात सदक्ष ग्राम पंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ बिस्किटे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.