Home Social नागपंचमीच्या दिवशी बिन विषारी सापाचे नागरिकांना झाले दर्शन… — सर्पमित्रांनी पकडला...

नागपंचमीच्या दिवशी बिन विषारी सापाचे नागरिकांना झाले दर्शन… — सर्पमित्रांनी पकडला साप…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     चिमूर तालुका अंतर्गत भिसी पासून तीन कि.मी.अंतरावरील मौजा पुयारदंड येथे दि. 29 ला वन्यप्रेमी समीर बल्की यांना माहिती होताचं घटनास्थळी जाऊन पाहिनी केली.

      तिथे अंतकला जाधव यांच्या घरी बिनविषारी एल्या साप आढळून आला.

       सध्या पावसाळ्यात साप,विंचू,घोरपड ईतर कोरड्या जागेवर रहदारी करायला येते आहे.वन्यप्रेमी ने सर्पमित्राला फोन करून तात्काळ बोलवले .

       सर्पमित्र सोहेल शेख,शंकरपूर यांना फोन करून बोलाविले.त्यांनी आल्यानंतर लगेच साप पकडला आणि फॉरेस्ट विभाग,शंकरपूर येथे नोंद करून जंगलात सोडण्यात येणार असे सांगितले.

       यावेळी सर्पमित्र सोहेल शेख,साहिल शेख,अभिषेक चंदनखेडे,लोकेश कावळे,मुस्ताक शेख,इत्यादी नागरिक उपस्थित होते.