चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी :- ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब तर्फे लाखनी निसर्गमहोत्सव तसेच इंटरनॅशनल टायगर डे च्या निमित्ताने वाघांचे जंगलातील म्हत्व व त्याविषयक समाज जागृती करण्यासाठी टायगर फेस पेंटिंग, टी शर्ट पेंटिंग, टायगर मास्क मेकिंग तसेच टायगर ड्रॉइंग विथ स्लोगन स्पर्धांचे आयोजन ताजुश शरिया कोचिंग क्लासेस यांचे प्रमुख सहकार्याने व अ भा अंनिस शाखा लाखनी तसेच नेफडो जिल्हा भंडारा यांचे सहकार्याने लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्कवर घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे तर ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब चे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी अशोक नंदेश्वर तसेच ताजुश शरिया कोचिंग क्लासेस चे संचालिका मिनाज मोटलानी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायत पर्यावरण दूत प्रा.अशोक गायधने यांनी इंटरनॅशनल टायगर डे का साजरा केला जातो,वाघाचे जंगलातील महत्व तसेच त्यांना असलेले विविध धोके त्याचबरोबर अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने वाघ प्राण्यांविषयी असलेल्या विविध अंधश्रद्धा व गैरसमज यांवर प्रकाश टाकला.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन ताजुश शरिया कोचिंग क्लासेस इथे करण्यात आले.यास्पर्धेत राणी लक्ष्मी कन्या विद्यालय लाखनी ,एम डी एन फ्युचर स्कूल लाखनी ,स्कायवर्ड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल पिंपळगाव, पोद्दार इंग्लिश स्कूल भंडारा, महर्षी विद्या मंदिर भंडारा, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल लाखनी, लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल लाखनी तसेच माऊली इंग्लिश कॉन्व्हेन्ट लाखनी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
वाघ चेहरा रंगवा स्पर्धेत प्रायमरी गटात सुमती बजाज,शेहरीश सय्यद, अल्फिया दयाला, आलिया आकबानी यांचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक इनाया छवारे ,अनम आकबानी, स्पर्श बावनकुळे यांना प्राप्त झाला , तृतीय क्रमांक झेनब छवारे, अर्णवी कांबळे,रेशवी भैसारे यांना प्राप्त झाला.हायस्कूल गटात प्रथम क्रमांक जान्हवी निर्वाण, मनस्वी शहारे,श्रध्दा नंदेश्वर,शुभम नंदेश्वर यांना तर द्वितीय क्रमांक खवाईश टहिल्यानी, मिनाज मोटलानी हिला तर तृतीय क्रमांक मिताली गायधनी व पारूल खेडीकर हिला प्राप्त झाला. स्पर्धा निरीक्षण मिनाझ मोटलानी अनम आकबानी, आलिया आकबानी यांनी केले.
टायगर मास्क मेकिंग स्पर्धामध्ये प्रिन्सी बावनकुळे, ख्वाइश टहील्यानी , आरोही कावळे, अर्णवी कांबळे, नायरा पाटील यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक श्रध्दा नंदेश्वर, मिताली गायधनी, परिधि भोंगाडे यांना द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक नित्या कावळे, जान्हवी निर्वाण, आराध्या आगलावे यांना प्राप्त झाला. टायगर टी शर्ट मेकिंग स्पर्धामध्ये मिताली गायधनी व सेहरिश सय्यद यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
टायगर ड्रॉइंग विथ स्लोगन स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक श्रध्दा नंदेश्वर , रेशवी भैसारे, प्रिन्सी बावनकुळे, स्वरा साखरवाडे यांना तर द्वितीय क्रमांक जान्हवी निर्वाण, सुमती बजाज, मिताली गायधनी तर तृतीय क्रमांक आलिया आकबानी , योगिता मळकाम, आराध्या आगलावे यांना प्राप्त झाला.अध्यक्षस्थानी असलेले भैय्याजी बावनकुळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ करिता पैसे दिले.कार्यक्रमाचे संचालन अशोक वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन मिनाझ मोटलानी हिने केले.
कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.मनोज आगलावे,देशमुख सोनोग्राफी व एक्स रे सेंटरचे संचालक डॉ.प्रमोद इमदेव देशमुख, अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षकीय अभियंता नितीश नागरीकर,बांधकाम कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी, कृतिशील नगरसेवक संदीप भांडारकर,लाखनी नगरपंचायतचे सिटी कोऑर्डीनेटर लीना कळंबे,सावरी सरपंच सचिन बागडे, श्रीमल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे व डॉ.छगन राखडे ,नाना ऑप्टिकल्सचे नाना वाघाये , सेवानिवृत नायब तहसीलदार गोपाल बोरकर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,योगेश्वर डोर्लीकर,रमेश गभने, सेवानिवृत प्राचार्य अशोक हलमारे व माधवराव भोयर , प्राचार्य प्रदीप गायधनी यांचे प्रमुख उपस्थितीत हस्ते वितरित करण्यात आले.



