Home Social त्या विद्युत रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्ताई ३ दिवसात करा :- उपसरपंच अशोक चौधरी.‌

त्या विद्युत रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्ताई ३ दिवसात करा :- उपसरपंच अशोक चौधरी.‌

       विद्युत रोहित्रचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रक्रियेद्वारे एका अल्टरनेटिंग-करंट सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये किंवा एकाधिक सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.विद्युत रोहित्र इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्त्वावर स्टेप अप किंवा स्टेप डाउन व्होल्टेजवर कार्य करतो.

         शंकरपूर येथील राजीव गांधी विद्यालयाच्या समोर असलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने ते मागिल १० दिवसांपासून बंद आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांना खंडित असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे आहे.

       सदर परिसरातील खंडित असलेला विद्युत पुरवठा नियमित करण्यासाठी शंकरपूर येथील विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

       मौजा शंकरपूर येथील राजीव गांधी शाळेच्या समोरील डीपी वरील ट्रान्सफार्मर ८ ते १० दिवसापासून बंद असल्यामुळे मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

       शंकरपूर येथील राजीव गांधी शाळेसमोरील डीपी वरील ट्रान्सफार्मर गेल्या ८ ते १० दिवसापासून बंद असल्या मुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.एक वर्षापासून वारंवार ट्रान्सफॉर्मर बंद होण्याची समस्या उदभोवत आहे.

      अनेकदा याबाबत तोंडी सूचना दिल्यानंतरही ट्रान्सफॉर्मर बदल करणे संबंधाने कोणतीही कारवाही केलेली नाही असेही अर्जदार तथा उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.

      त्या परिसरामध्ये आटा चक्कीचे व्यवसाय करत असून त्यांना वर्षातून अनेकदा या समस्यांमुळे आर्थिक भूदंड बसत अआहे.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही कराल व सदर समस्या येत्या ३ दिवसात सोडवली नाही तर त्या परिसरातल्या नागरिकांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

        निवेदनाच्या प्रती करिता ना.श्री.देवेन्द्रजी फडणवीस,मख्यमंत्री तथा उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य,कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.कंपनी वरोरा,उप कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.कंपनी चिमूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.