Home Social नागपंचमी एक बौद्ध पर्व आहे….

नागपंचमी एक बौद्ध पर्व आहे….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

     नागलोक हे भारताचे मूलनिवासी आहेत.त्याकाळी त्यांना असुर असे म्हटले जात होते.नागवंशीय अनंत,वासुकी,शेष,कालिया हे सारे नाग प्रसिद्ध होते.संपूर्ण भारतात त्यांचे वर्चस्व होते आणि हे नाग लोक भगवान बुद्धांचे अनुयायी होते,त्यांचे उपासक होते.त्यांचे साम्राज्य भारत,युनान,चीन,जपान आधी देशांमध्ये होते.

            नागवंशीय लोक श्रावण पंचमीला वार्षिक पंचायत (मीटिंग) बोलावीत असत.तो दिवस नागवंशी यांचा मुख्य नेता ठरवण्यासाठी केला जात होता.त्या दिवशी लोक अंघोळ करून बुद्ध वंदना घेत आणि एका संथागार या ठिकाणी एकत्र येत,ते आपसात प्रेमाने वागत.

         मुख्य नेता निवडण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या.त्यात तलवारबाजी,घोडेस्वारी,तिरंदाजी,मल्लयुद्ध आणि बऱ्याच काही स्पर्धा असत.यांच्यामध्ये जो यशस्वी होत असे तो मुख्य नेता ठरत असे.या खेळांमधून लोकांची वीरता,साहस प्रदर्शित करण्यासाठी या खेळांचे आयोजन केले जात असे.

       आपल्या वंशाचा सेनापती किंवा मुख्य किंवा श्रेष्ठ निवडण्यासाठी वार्षिक बैठक करीत होते हा दिवस नागवंशी या लोकांची फक्त एक परंपरा किंवा पराक्रम वीरता दाखवण्याचा दिवस नव्हता तर त्या दिवसाचे महत्त्व धार्मिक श्रद्धा समर्पणाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

       कारण या दिवशी नागवंशी राजा परिचित यांना जनमेजय याने अग्नीत टाकून मारले होते. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष वाढला होता.यामुळे हा दिवस त्या नागांच्या स्मृती प्रीत्यर्थ पाळला जातो.

       नागपंचमी हा दिवस यासाठी पाळतात की,बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात या नाग राजांनी केला ते पाच नागवंशी राजे म्हणजे अनंत नाग म्हणजे शेष नाग,वासुकी नाग,तक्षक नाग,करकोटक नाग आणि ऐरावत नाग या पाच पराक्रमी राजांशी संबंधित आहे. जम्मू काश्मीरचा राजा शेषनाग होता.कैलास मानसरोवर चा राजा वासुकी नाग होता तक्षशिलाचा राजा तक्षक होता. करकोटक आणि ऐरावत हे देखील मोठे राजे होते.

     रावी नदीच्या जवळ या पाच ही राज्यांची सीमा होती.म्हणून नागपंचमीला या पाचही राज्यांच्या आठवण कायम ठेवण्यासाठी समारोह संपन्न करीत असत.

नागिनी या नावाची एक राणी देखील होऊन गेली….

       शेषनाग,वासुकी नाग,तक्षक नाग,करकोटक नाग,ऐरावत नाग या पाचही राजाने बुद्धांचे संरक्षण केले होते.ते बुद्धांचे उपासक होते.त्यामुळे ते पाचही नाग प्रतीकाच्या रूपात बुद्धांच्या मूर्ती पाठीमागे दाखवलेले आहेत.