Home Maharashtra कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी 2025 या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन ना.देवेंद्र...

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी 2025 या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन ना.देवेंद्र फडणवीस यांच्या  शुभहस्ते संपन्न…

  बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       आषाढी वारीनिमित्त कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरच्या आवारात भरविण्यांत आलेल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी 2025 या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उ‌द्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेव यांचे शुभहस्ते व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली करण्यांत आले.

        मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन झालेनंतर त्यांनी प्रदर्शनातील स्टॉलवर भेट देवून माहिती घेतली व भव्य कृषि प्रदर्शनाचे कौतुक केले. स्टेजवरील फोटोपुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली व बाजार समितीचे वतीने उ‌द्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आमदार श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केले.

       यावेळी ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येते तर राज्य शासनाच्या विविध योजना असतात. याची सर्व माहिती या कृषि प्रदर्शनामध्ये पहावयास मिळाली याचा फायदा वारकरी शेतकरी यांना नक्कीच होईल. एआय सारखे नवीन तंत्रज्ञानाची माहितीही बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे.

       यामुळे शेतीची उत्पादकता वाढवून शेतकरी यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. यासह त्यांनी शेती क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याचेही जाहीर केले. तसेच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना राबवत असुन याचाच एक भाग म्हणून जिल्हयामध्ये पुढील वर्षापासुन शेतकरी यांना दिवसा वीज देण्याचे धोरण असल्याचे सांगितले.

       तसेच आ.प्रशांतराव परिचारक यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेल्या या क्षि प्रदर्शनातुन सर्वसामान्य जनतेस, शेतकरी यांना शेतीपुरक साहित्य, उपयोगी तंत्रज्ञान, अद्ययावत माहिती अवश्य घेता येईल व याचा लाभही सर्वांनी घ्यावा असेही सांगितले.

       प्रदर्शनातील स्टॉल बाबत व सहभाग घेतलेल्या डाळींब शेतकरी यांचे विशेष कौतुक केले. शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा त्यांचे आरोग्य चांगले रहावे अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करित शेतकऱ्यांसाठी पुर्ण सहकार्य करू, सरकार सदैव आपले सोवत आहे व कृषि प्रदर्शन आयोजीत केले बाबत बाजार समितीचे आभार मानले.

       तत्पूर्वी कृषि मंत्री ना.माणिकराव कोकाटे बोलाताना म्हणाले की, सोलापुर जिल्हा फलोत्पादनामध्ये आघाडीवर असुन केळी निर्यातीमध्ये राज्यात पहिला आहे. असे म्हणुन बाजार समितीच्या कामकाजाची व कृषि प्रदर्शनाचे कौतुक केले.

        तसेच पणन व राजशिष्टार मंत्री ना.जयकुमार रावल यांनी पंढरपूर बाजार समिती राज्यातील वेदाणा मालाची मोठी बाजारपेठ असुन त्यासाठी ब्रेडींग व प्रसिध्दी केली जाईल असे सांगितले तसेच वाजार समितीमध्ये कृषि संबंधातील नवनवीन योजनांचा समावेश करू असे आश्वासन दिले.

       तसेच यावेळी बोलताना जिल्हयाचे आमदार श्री प्रशांतरावजी परिचारक यांनी या कृषि महोत्सवाचे आयोजन गेल्या १० वर्षांपासुन करण्यांत येत असुन शेतकरी असणारे वारकरी यांना शेतीविषयक विविध माहिती देण्याचा एक प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

       तसेच पंढरपूर बाजार समितीचा राज्यामध्ये पाचवा तर जिल्हयात प्रथम क्रमांक आल्याचे सांगितले तसेच यावर्षी बेदाणा मालास विक्रमी प्रति किलो रु.७५०/- दर बाजार समितीमध्ये मिळाल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या वतीने विविध योजना तसेच शेतकरी व वारकरी हिताचे निर्णय घेतल्यामुळे वारकरी व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

       बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाचे वतीने सभापती श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. तसेच उपसभापती श्री. राजुबापु विठ्ठलराव गावडे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

        या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी 2025 या कृषि महामहोत्सव व प्रदर्शनासाठी बाजार समितीचे आवारात प्रदर्शन सुरू असुन या प्रदर्शनामध्ये सुमारे 150 विविध स्टॉल आहेत. यामध्ये शासकीय विभागाच्या विविध योजना माहिती, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना माहिती, शेतीविषयक तंत्रज्ञान, नवीन औजारे, औषधे अद्ययावत माहिती तसेच विविध उपक्रम यांची माहितीचा

       लाभ या स्टॉल मधुन हजारोंच्या संख्येने वारकरी, शेतकरी बंधु-भगिनी घेत आहेत.

         याप्रसंगी बेदाण्याचा हार घालुन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे साहेब व पणनमंत्री ना.श्री.जयकुमार रावल साहेब यांचा बाजार समितीचे वतीने जाहिर सत्कार करण्यांत आला.

       यावेळी आमदार श्री. विजयकुमार देशमुख, आमदार श्री.गोपीचंद पडळकर, आमदार श्री. समाधानदादा आवताडे, आमदार श्री. रणजितसिंह मोहीते-पाटील, आमदार श्री. अभिजीत पाटील, आमदार श्री.पाचपुते, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार साहेब, सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद साहेब, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री. दिनकरभाऊ मोरे, व्हा. चेअरमन श्री. कैलासराव खुळे (सर), अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सतिशराव मुळे, युवक नेते श्री. प्रणवजी परिचारक,श्री. चेतनसिंह केदार माजी नगराध्यक्ष श्री. लक्ष्मणराव शिरसट, बाजार समितीचे माजी सभापती श्री. दिलीपआप्पा घाडगे,श्री.दाजी पाटील, श्री. विष्णु रेडे, श्री. भगवानराव चौगुले, उपसभापती श्री. गंगाराम विभुते, श्री. लक्ष्मणराव धनवडे, श्री संतोष घोडके, श्री. विवेक कचरे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. वामनराव माने (सर), माजी उपसभापती श्री. प्रशांत देशमुख, श्री. अरूण घोलप, जि.प.सदस्य श्री.बाळासाहेब देशमुख, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. दिलीपराव गुरव, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. सुदाम मोरे, श्री.बाळासाहेब यलमर, श्री. नानासाो गोसावी, श्री. माउली हळणवर,श्री. सुभाष मस्के सर, श्री. हरीभाउ गावंधरे, श्री. बाळासाहेब शेख, श्री. शुकाचार्य गवळी, श्री. रघुनाथ गोडसे, श्री. सीतारामभाऊ नागणे, श्री. रमेश गाजरे, श्री. इब्राहिम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

        या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक श्री. दिलीप त्रिंबक चव्हाण, श्री.तानाजी चंद्रकांत पवार, श्री.हरिभाउ मच्छिंद्र फुगारे, श्री. महादेव पंढरीनाथ बागल, श्री. संतोष पंढरीनाथ भिंगारे, सौ. शारदा अरूण नागटिळक, सौ. संजिवनी बंडू पवार, श्री. महादेव सुखदेव लवटे, श्री. नागनाथ भिमराव मोहिते, श्री. अभिजीत दिनकर कवडे,श्री. पंडीत मारूती शेंबडे, श्री. वसंत महादेव चंदनशिवे, श्री. शिवदास वामन ताड,श्री.सोमनाथ सदाशिव डोंबे, श्री. यासीन अजीज बागवान, श्री. आबाजी औदुंबर शिंदे, सचिव श्री. कुमार घोडके, सहा. सचिव श्री.गजेंद्र जोशी आदी सह. वारकरी, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         तर कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच या कृषि प्रदर्शनाचे इव्हेंट मॅनेजमेंट मे. शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट प्रा.लि. कराड यांनी केलेले आहे.