Home Maharashtra आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु… — आमदार अभिजित वंजारी सह अनेक...

आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु… — आमदार अभिजित वंजारी सह अनेक आमदारांनी दर्शविला पाठिंबा…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

      राज्यातील शालेय शिक्षण विभागाने 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान लागू केले आहे.

     परंतु नऊ महिने पूर्ण होऊनही शासनाने अद्याप निधी वितरित केलेला नाही.याविरोधात राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्रित येऊन आंदोलन करीत आहेत. 

      या आंदोलनात सहभागी होत आमदार अभिजित वंजारी आणि इतर आमदार व नेते मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

        मात्र शालेय शिक्षण विभाग आपल्याच निर्णयावर अनास्था का म्हणून दाखवतो आणि शिक्षकांना आंदोलन करण्यासाठी भाग का म्हणून पाडतोय,हे गुढ उघड होणे गरजेचे आहे.