Home Maharashtra अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी नियमांचे केले उल्लंघन…

अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी नियमांचे केले उल्लंघन…

       रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

      अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टचे उल्लंघन करून प्राचार्यांच्या पेन्शन केस,वैद्यकीय सेवा प्रतिपूर्ती बिल,सेवा पुस्तिका या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे अधिकार काढून प्राचार्यांनाच सेल्फ अटेस्ट करुन जमा करण्याचे आदेश निर्गमित केले. 

       याविरोधात महामहिम राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे दाद मागण्यासाठी आमदार धिरज लिंगाडे व आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील काही मंडळींनी महामहीम राज्यपाल तथा कुलपती श्री.सी.पी. राधाकृष्णन यांना निवेदन सोपविले.