Home Maharashtra विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरण्याकरीता सुचना…

विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरण्याकरीता सुचना…

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली, : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत.

      त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन 2024 व दिनांक 01 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून गृहचौकशी अहवालाच्या अधिन राहुन पूर्ण माहिती असलेल्या एकूण 224 उमेदवारांची अंतिम जेष्ठता सूची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

       या कार्यालयाचे पत्र दिनांक 28.04 2025 अन्वये प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक 1 ते 224 पर्यंतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे.

        त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक 25 जून 2025 रोजी ठिक सकाळी 11.00 वाजता वर्ग-3 व वर्ग-4 च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पुर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक 01 ते 60 पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्तऐवजासह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशाकरीता उपस्थित राहावे.

        प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला /भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.