ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
चांगले आरोग्य हे मानवाची अमूल्य संपत्ती आहे यावर प्रसन्नता समृद्धी, समाधान व इतर क्रिया निर्भर असतात. निरोगी शरीर असणे केवळ व्यक्तीसाठी नाही तर समाज व राष्ट्राकरिता अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या माध्यमातून जीवनातील सर्व कार्य संपन्न होत असतात.
त्यामुळे चांगले शरीर असेल तरच सर्व कार्य सफलतापूर्वक पूर्ण करता येतात. निरोगी व्यक्तीच आपले भाग्य निर्माण करू शकतो. निरोगी आरोग्य हा असा आधारस्तंभ आहे ज्यावर व्यक्ती, समाज व राष्ट्राचे भाग्य निर्भर आहे. आपल्याला निरोगी राहण्याकरिता योग एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो.
योग म्हणजे जोडणे, जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन तसेच मानवाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक एकीकरण म्हणजे योग होय. आपणास दैनिक जीवनामध्ये नियमित योग करणे अति आवश्यक आहे. योग आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. योग निरोगी जीवन जगण्याचे कला व विज्ञान आहे.
हे एक अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित अध्यात्मिक अनुशासन आहे जो शरीर आणि मनामध्ये सामंजस्य साधण्यासाठी मदत करतो. योग जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सामंजस्य साधून सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जसे शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक, बौद्धिक, अध्यात्मिक विकास साधतो. योग आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपल्याला नियमित आणि क्रमबद्ध योगाभ्यास करायला पाहिजे.
सर्वात आधी वार्मअप नंतर सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम व शेवटी ध्यान साधना करायला पाहिजे. तणाव कमी करणे, शरीरामध्ये लवचिकता आणणे, मास पेशींना मजबूत करणे, चांगल्या प्रकारची झोप येणे, शरीर रोगमुक्त करणे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, वजन नियंत्रित करणे, हड्डी आणि जोडांना मजबूत करणे, ब्लड शुगर नियंत्रित करणे, पचनशक्ती सुधारणे, हृदयाच्या आजारांचे धोके कमी करणे, शारीरिक दुखणे कमी करणे, एकाग्रता वाढविणे, आत्मविश्वास वाढविणे, श्वासावर नियंत्रण करणे, ऊर्जा स्तर वाढविणे, थकावट, तणाव दूर करणे यासाठी योग अत्यंत सहाय्यक ठरतो.
योग करते वेळी विशेषज्ञ यांच्या मार्गदर्शनामध्ये करणे आवश्यक आहे. स्वच्छ शांत आणि हवादार जागेवर करायला पाहिजे. तसेच आरामदायक कपडे वापरून सकाळच्या वेळी खाली पोट हळुवारपणे चटईवर तसेच श्वासावर नियंत्रण करून योग करायला पाहिजे. योग करताना मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे. योग केल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये तसेच आंघोळ सुद्धा करू नये. योग करताना जबरदस्तीने न करता आपल्या क्षमतेनुसार करायला पाहिजे.
आधुनिक जीवनशैलीमध्ये एक खुशी व संतुष्ट प्रसन्नपूर्वक जीवन जगण्यासाठी योग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर आपण नियमित योगाभ्यास केला तर निरोगी आरोग्य मिळवू शकतो. योग एक मन व शरीर शुद्ध करण्याचे तसेच आपल्या भावनांना नियंत्रित करण्याचे एक उपयोगी साधन आहे जे आत्म परिवर्तन करण्यासाठी फार लोकप्रिय साधन आहे.



