बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
कांदा पिकाचा भाव कमी आल्यामुळे कांदा व्यवस्थापन करून मोठ मोठ्या शेडमध्ये साठवण शेतकरी करू लागलेली आहेत.
बावडा ते नरसिंहपूर परिसरामध्ये हजारो एकर जमिनीवर कांदा लागवड होती सर्वच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कांध्याची वाढ झाली.हजारो टण कांदा पीक उत्पन्न वाढले.
परंतु हामीभाव नसल्यामुळे पिकवलेल्या मालाचे मातीमोल होऊन कमी किमतीच्या दराने शेतकऱ्यांचा कांदा व्यापाप्यारी खरेदी करीत आहे. कांद्याला भाव कमी मिळात आसल्यामुळे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा निवडून चाळीमध्ये साठवण करून ठेवण्यात आलेला आहे.
कांद्याला भाव कमी असल्यामुळे शेतकरी मेटा कुठी आलेला आहे. राज्य शासनाने पिकवलेल्या कांद्याला योग्य हमीभाव मिळवून द्यावा.एवढीच महत्त्वाची मोठी कष्टकरी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतात मोतीमोल पेरलेल्या पिकासाठी शेतकरी राजा आडचणीत आलेला आहे. बळीराजा शेतकरी जिवंत राहिला तरच आन्न धान्य शेतमाल प्रत्येक बाजारपेठेत मिळेल. अन्यथा मिळणार नाही.म्हणूनच शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून द्यावा.
अशी मागणी नरसिंहपुर, टणु , गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, सराटी, लिंबोडी, गणेशवाडी,आधी भागातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
कांध्याला योग्य रुपयाचा दर मिळे पर्यंत कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे.
शेतकऱ्यांची मागणी मान्य करूनच शेतमालातील सर्व पिकांचे भाव योग्य जाहीर करावेत आशी एवढीच मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.



