प्राचीनकाळी भारतीय समाज हा एकसंघ होता,त्यामुळे माणसामाणसात प्रेम माया आपुलकी जिव्हाळा सलोखा समरसता एकी होती,हे या साऱ्या सकारात्मक गोष्टी किंवा गुण नांदत होते,वृध्दिंगत होत होते.परंतु कालांतराने या एकसंघ भारतीय समाज बंगला,याचे तुकडे झाले,म्हणजे विघटन झाले.यास पुढील गोष्टी कारणीभूत आहेत.ते खालील प्रमाणे.
1.परकियांचा प्रवेश : प्रथम भारतात पर्शियन म्हणजे आताचा इराण या देशातील लोक आले.इथे येऊन त्यांनी त्यांची संस्कृती सुरू केली,म्हणजे यदन्य संस्कृती.यामुळे जंगलतोडीस सुरुवात झाली, जल जंगल जमीन पशु हे इथल्या लोकांच्या जीवन जगण्याची साधने होती, यदन्य मुळे जंगल तोडीस सुरुवात झाली,त्यात पशूंचा बळी देणे पण सुरू झाले,त्यामुळे येथील मूलनिवासी लोकांनी त्यांच्या संस्कृतीला विरोध केला.आणि परकीय आणि भारतीय अशा लढाया होऊ लागल्या.त्यात कधी ते तर कधी हे हरायचे.हे बराच काळ चालले.शेवटी मूलनिवासी हरले.म्हणून यांना आर्यांनी दास बनविले.आणि यांचे बेहाल केले.
त्यांच्या संस्कृतीनुसार देव ,धर्म,पूजा,कर्मकांड,देवदेवता यांचे महत्व समजून सांगितले.मूलनिवासी यांना हे काहीही माहित नव्हते,परंतु ते जीत असल्यामुळे या पराजितांवर गुलाम दास म्हणून आपली संस्कृतीचे पालन करण्यास भाग पडले.
पर्शियन आर्य ब्राम्हण यांनी त्यांचा वैदिक धर्म लादला.त्या धर्मातील चार वर्णनानुसार एकसंघ समाजाचे चार भाग केले.ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार तुकडे केले,यास गौतमबुद्धाच्या तत्वद्न्यान मुळे समतेच्या तत्त्वापुळे विरोध होऊ लागला.अशोक सम्राटाने तर बौद्ध धर्म स्वीकारून वैदिकधर्मावर कुरघोडीच केली.
मौर्य साम्राज्यानंतर परत वैदिक ब्राम्हणधर्म हा हिंदुधर्माचा मुखवटा लाऊन इथे कार्यरत झाला.बुद्धाच्या क्रांतीला शह म्हणून प्रतिक्रांती झाली.मौर्य साम्राज्य धोक्या ने ब्राम्हण प्रधान पुष्यमित्र सुंग याने ताब्यात घेतले.त्याने आपल्या काळात मनु स्मृती चे कायदे आणि व्यवस्था निर्माण केली.या व्यवस्थे नुसार चार वर्ण बंदिस्त केले.शिवाय प्रत्येक वर्णात अनेक जाती निर्माण केल्या.धंद्यावरून जाती निर्माण केल्या.6500 जातीत भारतीय समाजाचे तुकडे या वैदिक ब्राह्मणधर्माने केले.त्यास हिंदुधर्म हे नाव दिले.
आर्या नंतर या देशात मुस्लिमराजानी आक्रमणे केली,अनेकवेळा केली.भारताची संपती सोने हिरे मोती लुटून नेले,काही मुस्लिम राज्य इथेच राहून आपला इस्लाम धर्माचा कधी लालुच दाखवून तर कधी जबरदस्ती करून आपला मुस्लिम धर्म वाढविला.हिंदुजातील अस्पृश्य आणि जुलूम सहन करणारे लोक स्वखुशीने मुस्लिम बनले.काही लोक सरदारकी,मनसबदारी ,जमीनदार होण्यासाठी मुस्लिम झाले.
यानंतर ख्रिश्चन आले,यांनी पण असेच केले.
मुस्लिमांचे राज्य 400 वर्ष,ख्रिश्चनांचे 150 वर्ष ,या दोघांचे आधी हजारो वर्ष आर्य ब्राम्हण वैदिक धर्माचे राज्य,यामुळे या देशात आर्य,वैदिक,हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,पारशी अनेक धर्मात एकसंघ भारतीय जनतेचे तुकडे तुकडे झाले.
यामुळे आपापसातील प्रेम संपून वैर द्वेष भावना निर्माण झाली.सलोखा,आपुलकी,बंधुभाव,सहकार्य हे सारे सद्गुण नाहीसे झाले.प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्माचा शत्रू झाला. एक जात दुसऱ्या जातीचा शत्रू बनली.यामुळे सारे जण धर्माच्या आणि जातीच्या नावाने आपापसात संघर्ष करू लागली,लढाया सुरू झाल्या,रक्तपात होऊ लागला.
याचे मूळ म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विषमतेवर आधारित समाजरचना व्यवस्था.या विषमतेचे मूळ म्हणजे आर्थिक आणि सामाजिक शोषण.शोषणाचे मूळ म्हणजे स्वार्थ,मोह, अधाशी प्रवृती.शासन प्रवृती,वंशवाद,घराणेशाहीची वृत्ती.विषमतेचे विचार,स्वार्थी विचार.स्वार्थी बुध्दीची हावरट व्यक्ती ,समता विरोधक व्यक्ती हेच या विघटनाचे पापी आहेत.हे स्वतःचाच स्वार्थ साधण्यासाठी जातीचा धर्माचा सत्तेचा दुरुपयोग करणारे हावरट साठेबाज स्वार्थी माणसे हे एकसंघ समाजाचे विघटन करणारे महापापी होत.यांचा बंदोबस्त केल्याशिवाय एकसंघ भारतीय समाजाचे चित्र दिसणार नाही.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 5 जून 2025.फोन: 9420912209.



