शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रसेवादल शाखा चिमूरच्या वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि जमीनतल्या जलस्रोताची पातळी वर ठेवण्यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

याचबरोबर प्रत्येक दिवसाला शुध्द प्राणवायू देण्याचे काम झाडे करीत असल्याने झाडे मनुष्यमात्रांचे जिवन ठरलेले आहेत.
यामुळेच राष्ट्रसेवा दल शाखा चिमूरच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन निमित्त स्वच्छता करीत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी इम्रान कुरेशी,सुरेश डांगे व सहकारी उपस्थित होते.



