ऋषी सहारे
संपादक
आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेते अधिकचे पैसे घेऊन मुद्रांक विक्री करत असल्याची तक्रार अण्णा हजारे विचार मंच जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष बसंतसिंग बैस,तालुकाध्यक्ष अनुरथ निलेकार,तालुका सचिव देवेंद्र ब्राह्मणवाडे,आरमोरी तालुका अध्यक्ष दिवाकर रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
आज पत्रकार परिषदेत असे आरोप करण्यात आले की संबंधित मुद्रांक विक्रेत्यांनी करोडो ची माया जमा केली असून त्यांचेवर कठोर कारवाईची मागणी ही करण्यात आली.
त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी,देसाईगंज (वडसा) यांनी तहसिलदार,आरमोरी यांचेकडून एच.एन. दोनाडकर,नायब तहसिलदार (नि.)तहसिल कार्यालय, आरमोरी यांनी दि. ०५.०३.२०२४ रोजी आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक व तिकीट खरेदी केलेल्या एकुण २९ नागरीकांचे दि.०५ व ०६ मार्च २०२४ या कालावधीत बयाण घेण्यात आले होते.
त्यांचे बयाणानुसार आरमोरी तालुक्यातील मुद्रांक विक्रेते सोबत बयाणानुसार मुद्रांक व तिकीटाचे रक्कम तीन मुद्रांक विक्रेते दोषी आढळले.
त्यानुसार,त्यांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्याचा आदेश (दि. २३, २०२५) पारित करण्यात आला आणि या आदेशावर अंकिता तांदळे,स्टॅम्प जिल्हा दंडाधिकारी,गडचिरोली यांची स्वाक्षरी आहे.
खालील स्टॅम्प विक्रीदारांचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
१) दिलीप भाऊराव इंकाणे, स्टॅम्प परवाना क्रमांक ४९०४००२….
२) जगदीश महादेव रामटेके, परवाना क्रमांक ४९०४००३…
३) चंद्रभान पैकुजी मेश्राम, स्टॅम्प परवाना क्रमांक ४९०४००१…



