शिंशो या एका (नागार्जुन यांच्या) समकालीन विद्वानाने नीशंक पणे लिहिले आहे की,”नागार्जुनाना महायान विचार सरणीचे जनक मानावयास काहीच हरकत नाही”.नागर्जूनांच्या व्यक्तिमत्वाला दुहेरी स्वरूप प्राप्त झाले होते.
असे एच केर्न म्हणतात,कारण तत्वज्ञानाच्या एका संप्रदायाचा पहिला श्रेष्ठ मार्गोपदेशक, एव्हढ्या पूर्तीच त्यांची ख्याती मर्यादित राहली नव्हती, तर पुढच्या दिशेने वाटचाल करणारी महायान पंथाची चळवळ पहिल्या टप्प्यावर असतांना नागार्जुन हे या चळवळी मधले अगदी सर्व समावेशक असे नाव बनून गेले होते.
“ते एका व्यक्तिमत्वाचे जितके प्रतिनिधित्व करतात,तितकेच एका चळवळीचे करतात” असे मत चार्ल्स ए एलियट यांनी मांडले आहे.
नागर्जूनांच्या अस्सल ग्रँथांची संख्या फार मोठी आहे आणि त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला असता आपण त्यांचे तेजस्वी विचार जाणू शकतो.त्यांच्या नावावर बरेच ग्रँथ आहेत,परंतु ते त्यांनी लिहिलेले नसून बनावट आहेत,असे भाषा शास्त्रीय व ऐतिहासिक समीक्षेवरून स्पष्ट झाले आहे.
एव्हढे असूनही नागार्जूनांचे एक समाधान कारक चित्र रेखाटने, हे जवळजवळ अशक्य आहे.
कारण समीक्षा असेही दर्षवते की,त्यांचे व्यक्तिमत्व दंतकथांनी आणि पूराण कथांनी आच्छादिलेले आहे.आणि त्या पैकी अनेक कथांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.
त्यांच्या ऐतिहासिक वास्तवा पर्यंत पोचण्याचा प्रयत्न म्हणून आपण जर उघड उघड दंतकथांच्या स्वरूपाची असलेली माहिती आणि स्पष्टपणे उत्तरकालीन असलेल्या घटना बाजूला सारल्या, तर फार थोडे हाती लागते.
त्यांचा काळ आणि जीवन वृत्तांत या विषयी पूर्णपणे निश्चित माहिती मिळावी असे तुम्हास वाटत असले,तरी आपल्याला तश्या प्रकारची थोडीशी देखील माहिती मिळत नाही.
कारण त्यांच्या विषयी परस्परविरोधी अश्या परंपरा आढळतात आणि त्या परंपरा मधुन मिळणारी माहिती अश्या प्रकारची आहे की,तिच्यातील कोणत्याही मुद्याविषयी सबळ कारणांच्या आधारे संशय व्यक्त करणे शक्य आहे.
त्यामुळे नागार्जुनाबद्धलचा विश्वसनीय असा ऐतिहासिक वृत्तांत मुळीच उपलब्ध नाही.
याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष त्यांच्या अस्तित्वा विषयीच सं शय घेणे शक्य झाले आहे.
एन वालेसर यांनी लिहिले आहे. “नागार्जुन हे एका अश्या माणसाचे नाव आहे,की जो खरोखर अस्तित्वात होता असे देखील आपण ठामपणे म्हणू शकत नाही – मग त्याच्या नावावर असलेल्या ग्रँथ संपदेचा तो लेखक आहे असे म्हणणे आणखी दूर.”
परंतु नागार्जुन अस्तित्वातच नव्हते,असे निष्कर्ष काढणे हास्यास्पद ठरेल.कारण त्यांचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी आढळतात.त्यांचे लेखन आढळते.
बौद्ध धर्माचा विकास आणि पौर्वात्य जगातील धर्म विचार यांच्यावर त्यांचा असाधारण प्रभाव पडल्याचे आढळते आशियातील लोकांनी पिढ्यान पिढया त्यांच्या मूर्ती बनविल्याचे आणि काही महात्म्यांनी त्याची नोंद केल्याची ही आढळते.



